Download App

PM Modi Speech : खर्गेचं भाषण ऐकून मनोरंजन झालं, पंतप्रधान मोदींचा खोचक टोला

  • Written By: Last Updated:

PM Modi Rajya Sabha Speech : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज राज्यसभेला संबोधित केले. पंतप्रधानांनी दुपारी 2 वाजता राज्यसभेला संबोधित करण्यास सुरुवात केली. यावेळी राज्यसभेत बोलताना मोदींनी काँग्रेस (Congress) पक्षाचा जोरदार समाजार घेतला. काँग्रेस पक्ष आता कालबाह्य झाला, अशी टीका त्यांनी केली. मल्लिकार्जुन खर्गेंच्या (Mallikarjun Kharge) भाषणानं भरपूर मनोरंजन झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

काँग्रेसवर ब्रिटिशांचा प्रभाव, स्वातंत्र्यानंतर गुलामगिरीची मानसिकता वाढवली, पीएम मोदींचा हल्लाबोल 

आपल्या भाषणाची सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी माननीय राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होण्यासाठी आलो आहे. मी आदरपूर्वक त्यांचे आभार आणि अभिनंदन करतो. चर्चेदरम्यान अनेक सदस्यांनी आपली मते मांडून चर्चा अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. माझ्या सर्व आदरणीय सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.

मोदी पुढे म्हणाले की, काहींनी केवळ आलोचना केली. टीका करणं ही त्यांची मजबुरी आहे. मी त्या दिवशी हे सांगू शकलो नाही, पण मी खर्गेजींचे विशेष आभार मानतो. मी खूप लक्ष देऊन ऐकत होतो. लोकसभेतील करमणुकीची उणीव तुम्ही भरून काढली, असा टोला मोदींनी लगावला.

घड्याळ अन् पक्ष अजितदादांना मिळताच अभिनेत्री तेजस्विनी पंडित सरसावली 

मोदी म्हणाले, एवढ्या सगळ्या गोष्टी बोलण्याचं स्वातंत्र्य खर्गेंना कसं मिळालं? लोकसभेत ज्या मनोरंजनाची उणीव भासत होती ती त्यांनी भरून काढली. त्या दिवशी दोन कमांडो आले नव्हते आणि त्यांनी संधीचा फायदा घेत भरपूर चौकार आणि षटकार मारले. ऐसा मौका फिर कहा मिलेगा, हे लक्षात घेऊन खर्गेंनी भरपूर भाषण केलं. खर्गेचं भाषण ऐकून मनोरंजन झालं, असं मोदी म्हणाले.

विरोधकांनी व्यत्यय आणण्यास सुरूवात केल्यानं पंतप्रधानांनी विरोधकांवर निशाणा साधला. मोदी म्हणाले की, पंतप्रधानांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला… आजही तुम्ही न ऐकण्याच्या तयारीत आला आहात. परंतु तुम्ही माझा आवाज दाबू शकत नाही. देशातील जनतेने हा आवाज बळकट केला आहे… यावेळी मी देखील तयारी करून आलोय, असं मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले, एनडीएच्या 400 जागांसाठी मल्लिकार्जुन खर्गे यांचा आशीर्वाद आहे. मात्र, पश्चिम बंगालमधून तुम्हाला आव्हान आलंय. कॉंग्रेस चाळीसचा आकडाही पार करू शकणार नाही. मात्र, मी प्रार्थना करतो, तुम्ही 40 जागा तरी जिंकाव्या.

यावेळी मोदींनी नेहरूंवरही निशाणा साधला. नेहरू आरक्षणाच्या विरोधात होते. काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरमध्ये एसी, एसटी, ओबीसी आरक्षणापासून वंचित आहेत. आरक्षणाला काँग्रेस सुरुवातीपासून विरोध करत आहे, असं मोदी म्हणाले. कॉंग्रेसचे विचार आऊटडेटेड आहेत, असा घणाघातही मोदींनी केला.

 

 

follow us