घड्याळ अन् पक्ष अजितदादांना मिळताच अभिनेत्री तेजस्विनी पंडित सरसावली
Tejaswini Pandit : मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) ही मराठी मनोरंजनसृष्टीतील अभ्यासू अभिनेत्री आहे. आपल्या प्रत्येक भूमिकेनं तिने चाहत्यांची कायम मने जिंकली आहेत. गेल्या काही दिवसांपासून चाहते तिच्या आगामी सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. परंतु तिने आता सामाजिक-राजकीय मुद्यांच्या भूमिकांवर हात घातला आहे. सध्या सोशल मीडियावर (social media) तिच्या पोस्टची जोरदार चर्चा रंगत आहे. अभिनेत्रीने केलेल्या ट्विटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जनता सगळं जाणते, ती मूर्ख नाही असे ट्वीट अभिनेत्रीने केले आहे. तिच्या या ट्वीटवरून सर्वत्र जोरदार चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर हे ट्वीट केल्याचे बोलले जात आहे.
जनता मूर्ख नाही.
सगळं जाणते. बेईमानी ओळखते. लक्षात ठेवणे !— TEJASWWINI (@tejaswwini) February 7, 2024
अभिनेत्रीची ही पोस्ट सध्या चांगलच चर्चेचा विषय बनला आहे. त्यावर आता अनेकांनी मोठ्या प्रमाणात कमेंट करत तिच्या मताला सहमती किंवा विरोध दर्शवला आहे. अभिनेत्रीने या पोस्टमध्ये तिने कोणाचेही नाव घेतले नाही. तिच्या या पोस्टवर म्हणूनच जनतेने कधी तुमच्या मनातल्या मुख्यमंत्र्यांना कधी साथ दिली नाही ! कोणती जनता?? @tejaswwini जी मंदिर आणि धर्म मध्ये अडकली आहे.. म्हणूनच सगळे ठाकरे घरी बसलेत. म्हणूनच जनतेने कधी राज साहेबांना निवडून दिले नाही !
जनता सगळे जाणते , लक्षात ठेवते आणि बरोबर कोलते ….ताईंनी (येत नसलेला) अभिनय सोडून सरळ राजकारणात यावे. उगाच कशाला उंटावरून शेळ्या हाकायच्या? बरोबर ना…. अशा कॉमेंट्सच्या प्रतिक्रिया अभिनेत्रींच्या पोस्टला येत आहेत. दरम्यान या पोस्टमुळे मराठमोळी अभिनेत्रीला काही जणांनी पाठिंबा देणाऱ्या कमेंट आहेत, तर काहींनी तिला ट्रोल देखील केले आहे..
Top 5 Movie: ‘बर्लिन ते द बकिंगहॅम मर्डर्स’ 2024 मध्ये पाहण्यासारखे टॉप 5 थ्रिलर
तेजस्विनीचा ‘स्वराज्य कनिका – जिजाऊ’ हा मराठी सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तेजस्विनी जिजाऊं मातेच्या भूमिकेत दिसणार आहे. आणि राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त तेजस्विनीचा या सिनेमातील पहिला लूक आऊट करण्यात आला आहे.