Download App

पंतप्रधानांकडून मतदारांचे आभार! शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर ट्विट करत म्हणाले…

PM Modi यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. एक्स या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरून यासंदर्भात पोस्ट करत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Image Credit: letsupp

PM Modi Thanks to voters after last phase of Loksabha Election : गेली दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या ( Loksabha Election ) आखाड्यातील आज शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर पंतप्रधान मोदी ( PM Modi ) यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. एक्स या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरून यासंदर्भात पोस्ट करत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात भाजपचं मोठा भाऊ, मुख्यमंत्रीही पत राखणार; या ‘एक्झिट पोल’ने पवार, काँग्रेसला धडकी भरवली

या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतीयांनी मतदान केले, ज्या ज्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला त्या सर्वांचे मनापासून आभार. त्यांच्या सक्रिय सहभाग हा आपल्या लोकशाहीचा मजबूत असा पाया आहे. या सर्व मतदारांची राष्ट्राप्रतिची वचनबद्धता आणि समर्पण हे सिद्ध करते की, आपल्या देशात लोकशाही उत्तरोत्तर मजबूत होत आहे.

त्याचबरोबर यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मतदारांमधील महिला आणि तरूणाईचे विशेष करून आभार मानले. ते म्हणाले की, मला भारताच्या नारी शक्ती आणि युवा शक्तीचे विशेष कौतुक आहे. त्यांची मतदानातील उपस्थिती ही अतिशय उत्साहवर्धक राहीली. असं म्हणत मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यातील आज शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.

लोकसभेच्या निकालापूर्वी शरद पवारांचा मोठा निर्णय; ‘या’ नेत्याला केलं राष्ट्रीय कार्याध्यक्ष

दरम्यान प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीला भेट दिली असून, या ठिकाणी बांधण्यात आलेल्या रॉक मेमोरियलमध्ये ध्यान धारणा करून स्वामी विवेकानंदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. भाजप नेत्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मोदी ध्यान मंडपममध्ये 30 मेच्या संध्याकाळपासून 1 जूनच्या संध्याकाळपर्यंत ध्यान केले. या ध्यान मंडपममध्ये स्वामी विवेकानंद यांना ‘भारत माते’बद्दल दिव्य दृष्टी प्राप्त झाल्याचे मानले जाते. 2019 च्या निवडणूक प्रचारानंतर पंतप्रधानांनी केदारनाथ गुहेत जात ध्यान केले होते. त्यांनंतर आता ते कन्याकुमारीा जाऊन ध्यान केले आहे.

follow us

वेब स्टोरीज