राज्यात भाजपचं मोठा भाऊ, मुख्यमंत्रीही पत राखणार; या ‘एक्झिट पोल’ने पवार, काँग्रेसला धडकी भरवली
Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यात मतदान झाल्यानंतर अनेक संस्थांनी एक्झिट पोल जाहीर केले आहेत. त्यात पुन्हा एकदा देशात एनडीए सत्तेत येतील. तर नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजनाम होतील, असा एक्झिट पोल आहे. हिंदी बेल्टमधील राज्यांनी पुन्हा एकदा मोदींवर विश्वास ठेवला आहे. परंतु महाराष्ट्रात महाविकास आघाडी (INDIA Alliance) आणि महायुतीमध्ये (NDA) जोरदार फाइट होती. एबीपी-सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार महायुती आणि महाविकास आघाडीत टक्कर आहे. या एक्झिट पोलने महायुतीला 22 ते 26 जागा दाखविल्या आहेत. तर भाजपला सर्वाधिक 17, शिंदे गटाला सहा, अजित पवार गटाला एक अशा जागा दर्शविल्या आहे. तर महाविकास आघाडीला 23 ते 24 जागा दाखविल्या आहेत. या मुळे महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे. काँग्रेसला आठ, ठाकरे गटाला 9 आणि शरद पवार गटाला 06 जागा दाखविण्यात आल्या आहेत.
Maharashtra Exit Poll : सांगलीत ‘नो मशाल’ ओन्ली ‘विशाल’; मविआत काँग्रेसने केली खेळी
पण इंडिया टुडे आणि माय एक्सिस इंडियाच्या एक्झिट पोलनुसार मात्र महायुतीला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील 48 जागांपैकी महायुतीला 28 ते 32 जागा दाखविल्या आहेत. तर महाविकास आघाडीला 16-20 जागा दाखविल्या आहेत. तर दोन अपक्ष बाजी मारतील, असा अंदाज या पोलचा आहे. या पोलनुसार भाजपला भाजप-20-22 जागा मिळू शकतात. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही स्टाइक रेट चांगला राहू शकतो. या एक्झिट पोलमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेला आठ ते दहा जागा दाखविण्यात आल्या आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीलाही एक ते दोन जागा दाखविण्यात आल्या आहेत.
सहा राज्यात काँग्रेसचा भोपळा; ‘या’ एक्झिट पोलने वाढली इंडिया आघाडीची ‘धाकधूक’
महाविकास आघाडीमध्ये ठाकरे मोठा भाऊ
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 9 ते 11 जागा दाखविण्यात आल्या आहेत. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 3-5 जागा दाखविल्या आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने दहा जागा लढल्या आहेत. परंतु काँग्रेसला मोठा धक्का बसताना दिसत आहे. काँग्रेसला केवळ तीन ते चार जागा मिळताना या पोलनुसार दिसत आहे.
दोन अपक्ष निवडून येणार
सांगली लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत झालीय. या मतदारसंघात भाजपचे खासदार संजय पाटील, ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात लढत झाली. या जागेवरून विशाल पाटील हे विजयी ठरवू शकतात. तसेच हातकणंगले मतदारसंघातही तिरंगी लढत झाली असली तरी येथून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी अपक्ष उमेदवार होते. या एक्झिट पोलनुसार त्यांच्या विजयाची शक्यता दर्शविण्यात आली आहे.
इंडिया टुडेचे एक्झिट पोल
महाराष्ट्र जागा-48
भाजप-20-22
शिवसेना-8-10
अजित पवार-1-2
शरद पवार-3-5
काँग्रेस-3-4
शिवसेना (ठाकरे गट) 9-11
अपक्ष-0-2