Download App

PM Modi : रात्री पाकला फटकारले अन् आज थेट आदमपूर एअरबेसवर; मोदींनी थोपटली सैनिकांची पाठ

  • Written By: Last Updated:

PM visits Punjab’s Adampur air base, shares pics with jawans :  भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी १२ मे रोजी राष्ट्राला संबोधित केले. यावेळी त्यांनी पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संघर्षावर थेट भाष्य करत पाकिस्तानला अणु हल्ल्याची धमकी सहन करणार नसल्याचा गर्मित इशारा देत मोदींनी (Narendra Modi) पाकिस्तानला जोरदार फटकारले होते. त्यानंतर आज (दि.13) मोदी थेट पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर (Adampur Air base) पोहोचले आणि सैनिकांची भेट घेतली. यावेळी मोदींनी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या कारवाईचे कौतूक करत भारतीय जवानांची पाठ थोपटली. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि त्यांच्या दहशतवाद्यांना योग्य उत्तर दिल्याचे मोदींनी कालच्या संबोधनात म्हटले होते. आदमपूर भेटीचे काही खास फोटो मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केले आहेत.

आदमपूर एअरबेस सुरक्षित

भारत- पाकमधील तणावाच्या परिस्थितीत पाकिस्तानने भारताचा आदमपूर एअरबेसवर हल्ला केल्याचा दावा केला होता. मात्र, आज मोदींनी याच एअरबेससा भेट देऊन जवानांसोबत चर्चा केली तसेच त्यांच्यासोबत फोटोदेखील काढले आहेत. त्यामुळे पाकिस्तानने केलेला दावा पूर्णपणे खोटा असल्याचे आणि आदमपूर एअरबेस सुरक्षित असल्याचे मोदींची आजच्या भेटीनंतर स्पष्ट झाले आहे.

Video : ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी; पुढील मिशनसाठी लष्करी तळ, सिस्टम रेडी; पाकला भारताचा मोठा मेसेज

मोदींनी शेअर केले खास क्षण 

पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेसला भेट दिल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. त्यांच्या पोस्टमध्ये मोदींनी लिहिले की, “आज सकाळी मी एएफएस आदमपूरला भेट दिली आणि देशाच्या शूर हवाई योद्ध्यांना आणि सैनिकांना भेटलो. धैर्य, दृढनिश्चय आणि निर्भयतेचे प्रतीक असलेल्या सैनिकांसोबत राहणे हा एक अतिशय खास अनुभव होता. आपल्या देशासाठी त्यांनी केलेल्या सर्व गोष्टींसाठी भारत नेहमीच त्यांचे ऋणी राहील.” असे मोदींनी म्हटले आहे.

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये इस्त्रोचा ‘मास्टर’ प्लान सक्सेसफुल; पाकिस्तानला फोडला पुरता घाम

वंदे मातरम् अन् भारत माता की जयच्या घोषणा

आदमपूर एअरबेसवरील भेटीवेळी मोदींनी जवानांकडून सैनिकांशी ६ मे च्या रात्री आणि ७ मे च्या सकाळी भारतीय सैन्याने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दलही चर्चा केली. यावेळी मोदी आणि जवानांकडून ‘वंदे मातरम् अन् भारत माता की जय’ च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

follow us