PM Narendra Modi Speech : माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांचं भारतीय लोकांविषयीचं मत आळशी असल्याचं होतं, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी केला आहे. दरम्यान, संसदेच्या अधिवेशनात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंचं भाषण झालं. या भाषणादरम्यान, मोदींनी काँग्रेसवर एक-एक मुद्द्यावरुन जोरदार निशाणा साधला आहे.
‘हिशोब तर द्यावाच लागणार’; कथित खिचडी घोटाळ्यावरुन सोमय्या-राऊतांमध्ये धुमश्चक्री
पंतप्रधान मोदी म्हणाले, देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा पंतप्रधान पंडित नेहरु यांनी भाषण केलं होतं. हे भाषण त्यांनी लाल किल्ल्यावरुन केलं होतं. यावेळी बोलताना नेहरु म्हणाले होते की, भारतात मेहनत करण्याची सवय कोणाला नाही. आपण एवढी मेहनत करीत नाही. जगातील इतर देश युरोप, जपान, चीन, अमेरिका आपल्यापेक्षा अधिक मेहनत करतात, असं नेहरु आपल्या भाषणात म्हणाले होते. म्हणजे, नेहरुंच्या मते भारतीय लोकं आळशी होते, असं म्हणत मोदींनी पुन्हा एकदा नेहरुंवर टीका केली आहे.
Video : तीन ठिकाणचा ताबा द्या, अन्य मशिदींकडे बघणारही नाही! गोविंददेव गिरी महाराजांचा मोठा दावा
तसेच इंदिरा गांधी यांचंही भारतीयांबद्दल असंच मत होतं. इंदिराजींनी म्हटलं होतं की, जेव्हा संकट येतात तेव्हा आपण डगमगतो, काँग्रेसचे लोकं भारतीय लोकांना असचं समजत आहेत. आजही त्यांचे विचार असेच आहेत. काँग्रेसला नेहमी एकाच कुटुंबावर विश्वास होता. त्यापुढे ते काहीच विचार करु शकत नाहीत. काही दिवसांपूर्वी आघाडी केली त्यानंतर पुन्हा एकला चलोरे चा नारा देण्यात येत आहेत..पण इंडिया आघाडीचं नियोजनच बिघडलं असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. आघाडीत ज्यांना एक दुसऱ्यांवर विश्वास नाही तर हे लोकं देशावर कसा विश्वास करतील. आम्हाला देशाच्या सामर्थ्यावर आम्हाला विश्वास आहे, लोकांच्या ताकदीवर विश्वास असल्याचं मोदी म्हणाले आहेत.
आमच्या सरकारची तिसरी टर्म फार दूर नाही. फक्त 100-125 दिवस उरले आहेत. मी आकड्यांवर जात नाही, पण मी देशाचा मूड पाहू शकतो. यात एनडीए 400 पार करेल आणि भाजपला नक्कीच 370 जागा मिळतील. सरकारची तिसरी टर्म खूप मोठे निर्णय घेणारी असेल, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
विरोधी पक्ष काँग्रेसवर निशाणा साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज देशात ज्या गतीने प्रगती करत आहे त्याची कल्पनाही काँग्रेस सरकार करू शकत नव्हते. आम्ही गरीबांसाठी 4 कोटी घरे बांधली, त्यापैकी 80 लाख पक्की घरे शहरी गरिबांसाठी बांधली. काँग्रेसच्या गतीने काम झाले असते, तर एवढे काम पूर्ण व्हायला 100 वर्षे लागली असती, 100 पिढ्या निघून गेल्या असत्या, असंही ते म्हणाले आहेत.