META च्या हेडविरोधातील गुन्हा अधिकाऱ्याला नडला ! मुख्यमंत्र्यांची डीसीपीवर कारवाई

PM Narendra Modi : तेलंगणातील सायबर क्राइमचे डीसीपी व्ही. अरविंद बाबू यांनी META विरोधात गुन्हा नोंदवली होता. आता अवघ्या तीन दिवसांत राज्यातील काँग्रेस सरकारने त्यांची बदली केलीय.

Cyber Crime DCP V. Arvind Babu

Cyber Crime DCP V. Arvind Babu

PM Narendra Modi Technical Glitch: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा व्हिडिओ तांत्रिक बिघाडामुळे काही काळासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरून हटविण्यात आला होता. त्यामुळे बराच गदारोळ झाला होता. याप्रकरणी मेटा कंपनीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा नोंदविणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध आता कारवाई झाली आहे. तेलंगणातील सायबर क्राइमचे डीसीपी व्ही. अरविंद बाबू यांनी META विरोधात गुन्हा नोंदवली होता. आता अवघ्या तीन दिवसांत राज्यातील काँग्रेस सरकारने त्यांची बदली केलीय. या निर्णयावर राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

TISS चा दीक्षांत समारंभ अचानक रद्द; प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते सरन्यायाधीश सूर्यकांत

META विरोधात राज्यात गुन्हा दाखल झाल्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी होती. कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसने उघडपणे पाठिंबा दिला होता. त्यामुळे या घडामोडींमुळे वरिष्ठ पोलीस अधिकारीही चक्रावले होते. मुख्यमंत्री कार्यालयाकडून भाजप समर्थकांच्या तक्रारींवरून गुन्हे कसे दाखल झाले ? याबाबतही चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर ही कारवाई झाली आहे.


META वर कोणते आरोप?

29 जुलै रोजी भाजप समर्थकांकडून मिळालेल्या तक्रारीच्या आधारे तेलंगणा सायबर क्राइम शाखेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करणारी कथित मॉर्फ्ड व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणात अनेक फेसबुक आणि इन्स्टाग्रामचे संचालक तसेच मेटा (META) इंडियाचे प्रमुख यांचाही समावेश करण्यात आला आहे. दरम्यान मेटाने वैध कायदेशीर आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधित कथित आक्षेपार्ह सामग्री हटवण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.


मी आयुष्यात अपयशी ठरलोय का?, महिना अखेरीस वडिलांकडून पैसे घेणाऱ्या तरुणाची पोस्ट व्हायरल


भाजप समर्थकांची तक्रार

भाजपचे प्रवक्ते एनव्हीएस सुभाष यांच्या पाठिंब्याने भाजप समर्थकांनी २९ जुलै रोजी ही तक्रार दाखल केली होती. सुभाष यांनी आरोप केला होता की, पंतप्रधान मोदी यांचे छेडछाड केलेले (मॉर्फ्ड) व्हिडिओ आणि छायाचित्रे फेसबुक व इन्स्टाग्रामवर प्रसारित केली जात होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे 20 फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंट्स मॉर्फ्ड सामग्रीचा वापर करत होते. तसेच, अशा सामग्रीला व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल META विरोधात कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. तेलंगणा भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही काही इन्स्टाग्राम खात्यांची चौकशी करण्याची मागणी करतो. ही खाती आमच्या मते पंतप्रधानांचा अपमान करणारी सामग्री प्रकाशित व प्रसारित करत आहेत. तसेच, देशाची सार्वभौमता, अखंडता आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा पोहोचवू शकतील अशा कथनांना प्रोत्साहन देत असल्याचे दिसून येते, असे तक्रारीत म्हटले होते.

Exit mobile version