Pm Narendra Modi : ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर ‘वेड इन इंडिया’ चळवळ सुरु करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi ) यांनी देशातील तरुणांना केलं आहे. उत्तराखंडमधील देहराडूनमध्ये आज उत्तराखंड गुंतवणूक समिटचं उद्घाटन मोदींच्या हस्ते पार पडलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi ) यांनी 400 हजार कोटींच्या प्रकल्पाची पायाभरणी केलीयं. यावेळी ते बोलत होते.
‘अॅनिमल’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! पहिल्या आठवड्यात जमवला 536.3 कोटींचा गल्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपल्याकडे असं मानलं जातं की, विवाहाची जोडी ईश्वर ठरवत असतो. जर ईश्वर जोडी बनवत असेल तर ईश्वराच्या चरणी येण्यापेक्षा जोडपे विदेशात का जातात? इथेच जोडप्यांनी आलं पाहिजे, मेक इन इंडियासारखीच वेड इन इंडिया अशी चळवळ सुरु झाली पाहिजे, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना केलं आहे.
तसेच उत्तराखंडमध्ये तुम्ही गुंतवणूक करा अथवा नका करु, पण पाच वर्षांत आपल्या कुटुंबातील एका सदस्याचा विवाह उत्तराखंडमध्ये करा, जर एक वर्षांत पाच हजार लग्न झाली तर नवीन इन्फास्ट्रक्चर बनलं जाणार असून हे भारताकडे मोठं सामर्थ्य असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
Telangana : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर रुग्णालयात दाखल; नेमकं काय घडलं ?
डबल इंजिन सरकारमुळे मोठा फायदा :
डबल इंजिन सरकारमुळे उत्तराखंडला मोठा फायदा होत आहे. भारताला पाहण्यासाठी भारतीयांसह विदेशांमध्ये अभूतपूर्व उत्साह आहे. उत्तराखंडमध्ये डबल इंजिन सरकारचे नेहमीच प्रयत्न दिसत आहेत. ऋषिकेश, कर्णप्रयागमध्ये रेल्वे सुविधा मजबूत असून पर्यटक क्षेत्र मजबूत असल्याचं मोदींन नमूद केलं आहे. दरम्यान, बोगद्यातून मजुरांना बाहेर काढण्याचं चांगल काम केलं असल्याचं म्हणत मोदींनी सरकारचं कौतूक केलं आहे.
दिल्ली-देहरादूनचं अंतर कमी होणार :
भारताच्या परिवर्तनाची सध्या हवा सुरु आहे. ऋषिकेश आणि कर्णप्रयागमध्ये रेल्वेची सुविधा आणखीन मजबूत होणार आहेत. उत्तराखंडमध्ये येणाऱ्या पर्यंटकांची संख्या मोठी असून ही रेल्वे सुविधा कारभाराला सोपं करीत आहे. या रेल्वे सुविधांमुळे दिल्ली आणि देहरादूनमधील अंतर कमी होणार असल्याचंही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.