Download App

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी PM मोदींनी प्रसिद्ध केले राम मंदिरावरील टपाल तिकीटे, जाणून घ्या खासियत

  • Written By: Last Updated:

Ram Janmabhoomi Postage Stamp : अयोध्येत (Ayodhya) येत्या 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते राममंदिरात (Ram Mandir) रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या कार्यक्रमाची देशभरात जय्यत तयारी सुरू असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री रामजन्मभूमी मंदिरावरील स्मरणार्थ टपाल तिकिटे (Ram Janmabhoomi Postage Stamp) प्रसिध्द केले. याशिवाय, जगभरातील प्रभू राम यांच्यावर जारी केलेल्या तिकिटांच्या पुस्तकांचेही प्रकाशन मोदींनी केलं.

Palak Tiwari : पलक तिवारीनं साडी नेसून दिला बोल्डनेसचा तडका… 

पीएम मोदींनी एकूण 6 तिकिटे जारी केली, ज्यात राम मंदिर, भगवान गणेश, भगवान हनुमान, जटायू, केवलराज आणि माँ शबरीची तिकिटे आहेत.

याबद्दल पीएम मोदी म्हणाले की, पोस्टल स्टॅम्पचे कार्य आपल्या सर्वांना ठाऊक आहे. पण, पोस्टल स्टॅम्प हे आणखी एक महत्वाची भूमिका बजावतात. हे टपाल तिकीट पुढील पिढीपर्यंत कल्पना, इतिहास आणि ऐतिहासिक प्रसंग पोहोचवण्याचे एक माध्यम आहे. टपाल तिकीटद्वारे इतिहासाचा एक भाग पत्राद्वारे इतरांपर्यंत पोहोचवल्या जातो. हा केवळ कागदाचा तुकडा नाही. हे टपाल तिकीटं इतिहासाच्या पुस्तकांमधील ऐतिहासिक क्षणांची एक संक्षेपित आवृत्ती आहे. या तिकिटांवर राम मंदिराचे भव्य चित्र आहे.

Jasmine Bhasin पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; आगामी चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर पाहिला? 

ते पुढे म्हणाले, पोस्टल स्टॅम्प ही मोठ्या विचारांची छोटी बॅंक आहे. टपाल तिकिटे कल्पना आणि ऐतिहासिक क्षण कॅप्चर करतात. टपाल तिकिटे पुढच्या पिढीला संदेश देतात. आज श्री रामजन्मभूमी मंदिरावरील 6 स्मरणार्थ टपाल तिकिटे आणि जगभरातील प्रभू रामावर जारी केलेल्या तिकिटांचा अल्बम प्रकाशित करण्यात आला आहे. मी देशातील जनतेचे आणि जगभरातील सर्व राम भक्तांचे अभिनंदन करू इच्छितो, असं मोदी म्हणाले.

पुस्तकात कोणते देश समाविष्ट आहेत?

या पुस्तकात विविध देशांतील श्री राम यांच्यावर आधारित टपाल तिकिटांचा समावेश आहे. राम मंदिर, चौपई ‘मंगल भवन अमंगल हरी’, सूर्य, सरयू नदी आणि मंदिराभोवतीची शिल्पे दर्शविली आहेत. 48 पृष्ठांच्या पुस्तकात यूएस, न्यूझीलंड, सिंगापूर, कॅनडा, कंबोडिया आणि संयुक्त राष्ट्रांसारख्या संस्थांसह 20 हून अधिक देशांनी जारी केलेली टपाल तिकिटे आहेत.

दरम्यान, 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. काल गुरुवारी ही मूर्ती राम मंदिरात आणण्यात आली. जय श्री रामचा घोषणा देत मूर्ती मंदिरात नेण्यात आली. रामलल्लाची मूर्ती ५१ इंच उंच आहे. ही मूर्ती शालिग्राम दगडावर कोरून बनवली आहे. रामललाची ही मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी पाच वर्षांत बनवली होती.

follow us