Priyanka Gandhi : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा (Congress) दारूण पराभव झाल्यानंतर पक्षात मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना उत्तर प्रदेश पक्षाच्या प्रभारी पदावरून हटवण्यात आले आहे. काँग्रेसने आता अविनाश पांडे (Avinash Pandey) यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे. नुकत्याच झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर आज काँग्रेसने हे मोठे संघटनात्मक फेरबदल केले.
काँग्रेसने उत्तर प्रदेश व्यतिरिक्त छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील पक्ष प्रभारी बदलले आहेत. राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना छत्तीसगडचे प्रभारी सरचिटणीस, तर रमेश चेन्निथला यांना महाराष्ट्राचे प्रभारी सरचिटणीस म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रभारी बदलले
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने छत्तीसगडच्या पक्ष प्रभारी कुमारी शैलजा यांना हटवले आहे. त्यांच्या जागी सचिन पायलट यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. छत्तीसगड व्यतिरिक्त काँग्रेसने मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, केरळ आणि तेलंगणाचे प्रभारीही बदलले आहेत.
काँग्रेसमध्ये फेरबदल; तेलंगणामध्ये विजय मिळवून देणाऱ्या प्रभारीकडे महाराष्ट्राची जबाबदारी
गोवा : तेलंगणातील मोहिम फत्ते केल्यानंतर माणिकराव ठाकरे यांच्याकडे गोवा, दमण आणि दीव, दादरा आणि नगर-हवेलीच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
मध्य प्रदेश : रणदीप सिंग सुरजेवाली यांच्या जागी जितेंद्र सिंग यांच्याकडे जबाबदारी आली.
झारखंड: काँग्रेस नेते जीए मीर यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे पश्चिम बंगालची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.
केरळ: काँग्रेस नेत्या दीपा दासमुन्शी यांची केरळच्या प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय त्यांना लक्षद्वीप आणि तेलंगणाची अतिरिक्त जबाबदारीही देण्यात आली आहे.
कर्नाटक : काँग्रेसने मध्य प्रदेश पक्षाचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांना हिंदी पट्ट्यातील राज्यातून हटवून त्यांच्याकडे कर्नाटकची जबाबदारी दिली आहे.
उत्तराखंड : कुमारी शैलजा यांना छत्तीसगडमधून हटवून उत्तराखंडच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपचा ‘मोदी गॅरंटी’वर भर, दिल्लीतील बैठकीत ठरली रणनीती
Congress President Shri @kharge has assigned the organisational responsibilities to the following persons with immediate effect. pic.twitter.com/qWhwiJzysj
— Congress (@INCIndia) December 23, 2023