Download App

वाद वाढला! राजनाथ सिंहांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर; म्हणाले, मी खर्गेंबरोबर..

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजनाथ सिंह यांच्यावर आरोप केला होता. यावर राजनाथ सिंह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Rajnath Singh replies Rahul Gandhi : विरोधक आणि सत्ताधारी पक्षात ओढाताण सुरू आहे. या पदासाठी (Lok Sabha Speaker Election) देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. सरकारने दावा केला आहे की सर्वसंमतीने स्पीकर निवड केली जात आहे. पण, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी राजनाथ सिंह यांच्यावर (Rajnath Singh) आरोप केला होता. आमच्या नेत्यांचा अपमान केला जात आहे असा त्यांचा आरोप होता. आता राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर राजनाथ सिंह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

राहुल गांधी यांनी आरोप केला होता की त्यांचं (राजनाथ सिंह) आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचं (Mallikarjun Kharge) बोलणं झालं होतं. त्यांनी फोन करण्यास सांगितलं होतं. पण त्यांनी कॉल केला नाही. आमच्या नेत्यांचा अशा पद्धतीने अपमान केला जात आहे. आता राहुल गांधींच्या या वक्तव्यावर राजनाथ सिंह यांनी जोरदार पलटवार केला आहे. मल्लिकार्जुन खर्गे एक ज्येष्ठ नेते आहेत आणि मी त्यांचा सन्मानच करतो. मी काल त्यांच्याशी तीन वेळा चर्चा केली आहे, असे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.

लोकसभा अध्यक्षपदासाठी पहिल्यांदाच होणार निवडणूक; इंडिया आघाडीनेही दिला तगडा उमेदवार

याआधी राहुल गांधी म्हणाले होते की राजनाथ सिंह यांनी खर्गेंना फोन कॉल केला. त्यांनी अध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी पाठिंबा मागितला. परंतु, विरोधी पक्षांनी स्पष्ट सांगितलं आहे की जर आम्हाला उपाध्यक्षपद मिळालं तरच आम्ही पाठिंबा देऊ. यानंतर राजनाथ सिंह यांनी पुन्हा कॉल करतो असे सांगितले होते परंतु अजूनही त्यांच्याकडून कोणतंच उत्तर मिळालेलं नाही. पीएम मोदी (PM Narendra Modi) सहकार्य करा असे सांगतात पण प्रत्यक्षात मात्र आमच्या नेत्याचा अपमान केला जात आहे. सरकारचा हेतू स्वच्छ नाही. नरेंद्र मोदींनी कोणतेच रचनात्मक सहकार्य नकोय. उपाध्यक्षपद विरोधकांना मिळालं पाहिजे अशी परंपरा राहिली आहे. त्याचं पालन झालं तर आम्ही नक्कीच अध्यक्षपदासाठी सत्ताधारी पक्षाला पाठिंबा देऊ.

सर्वसंमतीनेच अध्यक्ष निवडीचा इतिहास

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकसभा अध्यक्षपदासाठी पहिल्यांदा गणेश वासुदेव मावळकर यांची निवड झाली होती. त्यानंतर मागील लोकसभा निवडणुकीपर्यंत सर्वसंमतीने अध्यक्ष निवडले गेले आहेत. बाराव्या लोकसभेचं अध्यक्षपद टीडीपीच्या जीएमसी बालयोगी यांना देण्यात आलं होतं. त्यावेळी केंद्रात अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. त्यानंतरच्या तेराव्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून बालयोगी यांनाच नियुक्त करण्यात आले होते. परंतु, अध्यक्षपदावर असतानाच हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर शिवसेनेचे खासदार मनोहर जोशी यांना अध्यक्ष करण्यात आले होते.

follow us