विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधीच असणार; इंडिया आघाडीच्या बैठकीत झाली होती चर्चा, सूत्रांची माहिती
Congress leader Rahul Gandhi : कालापासून 18 व्या लोकसभा संसदेच अधिवेशन सुरू झालं आहे. (Lok Sabha) मागच्या दहा वर्षात काँग्रेसला बहुमत नसल्याने संसदेत विरोधी पक्षनेतेपद खाली होतं. मात्र, यावेळी काँग्रेसने चांगली मुसंडी मारल्याने काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद असणार आहे. दरम्यान, आता काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारणार का याबाब जोरदार चर्चा रंगली आहे. ही चर्चा सुरू असतानाच काँग्रेसमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुल गांधी ( Rahul Gandhi) या पदासाठी तयार झाल्याचं समजतय.
पहिल्या दिवसापासूनच सरकारविरुद्ध आक्रमक
काल अधिवेशनाचा पहिला दिवस होता. यावेळी संसद अधिवेशनादरम्यान लोकसभेमध्ये राहुल गांधींनी पहिल्या बाकावर विरोधी पक्षनेत्यांच्या स्थानावर बसून हे संकेत दिल्यामुळेही हा दावा काँग्रेसकडून केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीने तिसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यानंतर विरोधकांच्या इंडिया आघाडीने पहिल्या दिवसापासूनच सरकारविरुद्ध आक्रमक आघाडी उघडली असून काँग्रेस नेते राहुल गांधी या आघाडीचे नेतृत्व करत आहेत.
बैठकीमध्येही हा मुद्दा चर्चेत खासदारकीची शपथ घेताच कंगनाची गजब मागणी; मुख्यमंत्री शिंदेंची खोली द्या, ठाकरे गटाचा विरोध
लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते पदावरून त्यांनी सरकारला राहुल गांधींनी घेरावं असा आग्रह काँग्रेसमधून आणि इंडिया आघाडीतील मित्रपक्षांकडून होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्येही हा मुद्दा चर्चेत आला होता. त्यानंतर राहुल गांधीच विरोधी पक्षनेते असतील अशी चर्चा सुरू झालेली आहे.
बोलण्याची अधिक संधी
काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपविण्याची रणनीती आखण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते झाल्यास राहुल यांना लोकसभेत बोलण्याची अधिक संधी मिळेल व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बरोबरीने स्थान मिळेल, असाही काँग्रेसचा विचार असल्याचं समोर आलं आहे.
चर्चेत थेट सहभागी मोठी बातमी! नीट; परीक्षेच्या पेपरफुटीत लातूरचे धागेदोरे दिल्लीपर्यंत, मुख्याध्यापकास पोलीस कोठडी
सरकार आणि विरोधकांमधील चर्चेत थेट सहभागी होऊन राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट लक्ष्य करतील. त्याचप्रमाणे सरकारमधील महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्यांमध्ये देखील विरोधी पक्षनेत्यांना असलेले कायदेशीर स्थान पाहता, या पदाचा राहुल गांधी पुरेपुर उपयोग करतील असाही दावा या सूत्रांनी केला आहे.