खासदारकीची शपथ घेताच कंगनाची गजब मागणी; मुख्यमंत्री शिंदेंची खोली द्या, ठाकरे गटाचा विरोध

खासदारकीची शपथ घेताच कंगनाची गजब मागणी; मुख्यमंत्री शिंदेंची खोली द्या, ठाकरे गटाचा विरोध

Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रणौतने खासदार होताच आपला महाराष्ट्र कनेक्शन बाहेर काढलं आहे. (Atishi) तीने थेट महाराष्ट्र सदनाकडे एक अजब मागणी केलीयं. (Kangana Ranaut) काय तर दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोली (सूट) आपल्याला द्यावी अशी मागणी केलीयं. खासदार म्हणून मिळालेली खोली छोटी असल्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांची रूम आपल्याला मिळावी अशी मागणी कंगनाने केली आहे. (Maharashtra Sadan) तिच्या या मागणीने राजकीय वर्तुळासह सर्वत्रच मोठी चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्र सदन सर्वात सुंदर आहे

ही मागणी पूर्ण व्हावी यासाठी कंगणाने काही हालचालीही केल्याचं समोर आलं आहे. तीने महाराष्ट्र सदनातून महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याला फोन केल्याचीही सुत्रांची माहिती आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदनातील खोली दिली जाणार नाही, असं महाराष्ट्र सदनाने स्पष्ट केलं आहे. कंगना म्हणाली, ‘महाराष्ट्र सदन सर्वात सुंदर आहे. माझे काही मित्र इथे आहेत. महाराष्ट्र माझं घर आहे.’

हक्काची सिंगल खोली आहे  पाणी प्रश्न सुटेना; मंत्री अतिशी यांची तब्येत खालावली, रुग्णालयात केलं दाखल

शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी कंगनाच्या या मागणीचा चांगलाच समाचार घेतला आहे. “श्रीमतीजी हिमाचल प्रदेशातून निवडून आल्या आहेत. त्यांच्या निवासाची व्यवस्था हिमाचल भवन येथे व्हायला हवी. हिमाचल भवन येथे मुख्यमंत्री महोदयांचा खास कक्ष श्रीमतीजीना मिळत असेल तर काहीच हरकत नाही. महाराष्ट्राचे खासदार त्यांच्या हक्काच्या सदनात सिंगल खोलीत राहत आहेत श्रीमतीजी,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

मंडी लोकसभेत विजयी मोठी बातमी!नीट परीक्षेच्या पेपरफुटीत लातूरचे धागेदारे दिल्लीपर्यंत, मुख्याध्यापकास पोलीस कोठडी

कंगनाच्या या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काहींनी तिच्या मागणीचं समर्थन केलं आहे तर काहींनी ती मागणी अवास्तव असल्याचं म्हटलं. महाराष्ट्र सदनाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास केला असून त्यांनी स्पष्ट केलं आहे की, कोणत्याही व्यक्तीस मुख्यमंत्र्यांची खोली देणं शक्य नाही. अभिनेत्री कंगना राणौत हिमाचल प्रदेशातील मंडी येथून लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर विजयी झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज