Delhi Water Crisis: पाणी प्रश्न सुटेना; मंत्री अतिशी यांची तब्येत खालावली, रुग्णालयात केलं दाखल

Delhi Water Crisis: पाणी प्रश्न सुटेना; मंत्री अतिशी यांची तब्येत खालावली, रुग्णालयात केलं दाखल

Atishi Hunger Strike : हरियाणाने दिल्लीच्या हक्काचे पाणी सोडण्यास नकार दिला आहे. (Water Crisis) याला विरोध म्हणून आपच्या नेत्या आणि दिल्ली सरकांरमधील मंत्री आतिशी या आमरण उपोषण करत आहेत. (Atishi ) दरम्यान, त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. (Hunger Strike) गेल्या काही दिवसांपासून आतिशी यांनी उपोषणाला सुरूवात केली आहे.

शुगर लेव्हल रात्रीपासून कमी

उपोषणाच्या चौथ्या दिवशी आतिशी यांची तब्येत खूपच खालावली होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, माध्यमांशी बोलताना दिल्लीचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांनी आतिशी यांच्या तब्येतीबाबत अपडेट दिली. ते म्हणाले की, आतिशी यांची शुगर लेव्हल रात्रीपासून कमी होत होती. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

पाणीही घेतलेलं नाही मोठी बातमी! नीट परीक्षेच्या पेपरफुटीत लातूरचे धागेदारे दिल्लीपर्यंत, मुख्याध्यापकास पोलीस कोठडी

आम्ही आतिशी यांचे ब्लड सॅम्पल दिलं, तेव्हा त्यांची ब्लड शुगर ४६ झाल्याचं समोर आलं. पोर्टेबल मशिनद्वारे त्यांचे शुगर लेव्हल तपासलं तेव्हा ते ३६ आलं. डॉक्टर याबाबत पुढील सल्ला देतील असं भारद्वाज म्हणाले. तसंच, त्यांनी गेल्या काही दिवसांपासून पाणीही घेतलं नसल्याने त्यांना बोलण्यासही मोठी कसरत करावी लागत आहे. त्यांना उठण्यासही त्रास होत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

उपोषण करतच राहीन टीम इंडियाचा पराक्रम! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव करत सेमी फायनलमध्ये धडक

आतिशी याबाबत म्हणाल्या की, माझे ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर कमी होत आहे. माझं वजन देखील कमी झालं आहे. केटोन लेव्हल खूप वाढली आहे, ज्याचे दीर्घकालीन परिणाम शरीरावर होतील. पण, माझ्या शरीराला कितीही त्रास झाला तरी, हरियाणा सरकार जोपर्यंत पाणी सोडत नाही तोपर्यंत उपोषण करतच राहीन असा निर्धारही आतिशी यांनी यावेळी व्यक्त केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज