Download App

“अहंकाऱ्यांना प्रभू श्रीरामांनी 240 वरच रोखलं”; आरएसएस नेत्याचा भाजपला खोचक टोला

ज्या लोकांमध्ये अहंकार भरला होता, त्यांना प्रभू रामाने 240 वर मर्यादीत ठेवलं, असा टोला इंद्रेश कुमार यांनी भाजपला लगावला.

RSS on Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपची मोठी पिछेहाट झाली. चारशे पारचा (Lok Sabha Election Result) दावा करणाऱ्या भाजपला साधं बहुमतही मिळालं नाही. त्यामुळे जेडीयू आणि टीडीपीच्या टेकूने एनडीए सरकार स्थापन करावं लागलं. भाजपाची इतकी पिछेहाट का झाली याची उत्तरं शोधली जात असतानाच भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी विसंवाद हे एक प्रमुख कारण असल्याचं समोर आलं. निवडणूक काळात भाजप नेत्यांची विधानं, आरएसएसशी विसंवाद यामुळे अनेक मतदारसंघात भाजपाचा पराभव झाल्याची चर्चा आहे.

संघाच्या ऑर्गनायझर या मुखपत्रातूनही भाजपवर टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता आरएसएसच्या नेत्याने भाजपला टोचणारं विधान केलं आहे. ज्या लोकांमध्ये अहंकार भरला होता, त्यांना प्रभू रामाने 240 च्या संख्येवर मर्यादीत ठेवलं, असा खोचक टोला संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी लगावला आहे.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे काय बोलले?; भाजप ‘आरएसएस’वरही बंदी आणेल

राजस्थानातील कनोटा येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात कुमार यांनी हे वक्तव्य केले. ते पुढे म्हणाले, ज्यांनी स्वतःला सर्वात मोठा पक्ष असल्याचे म्हटले. त्यांना प्रभी श्रीरामांनी 240 जागांवरच अडवले. त्यांचा (भाजप) अहंकारच यासाठी कारणीभूत ठरला. काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा नामोल्लेख टाळत ज्यांनी प्रभू रामाला विरोध केला. त्यांनाही 243 वर मर्यादीत राहावं लागलं. हाच देवाचा न्याय असतो, असे इंद्रेश कुमार म्हणाले.

अतिआत्मविश्वास नडला : आरएसएस

निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने राष्ट्रीय स्वंयसेवक संघ प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी भाजप नेतृत्वाचे कान टोचले आहे. निवडणूक प्रचारा दरम्यान होणाऱ्या भाषणांची पातळी घसरलेली होती, असे निरीक्षणही नागपूरमधील एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी नोंदविले आहे. तर आता राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनाइजरनेही भाजपच्या बॅफफूटला जाण्याच्या कारणांवर सविस्तरपणे एक लेख लिहित भाजप नेतृत्वाला आरासा दाखविला आहे. भाजपला अतिआत्मविश्वास नडला, असे स्पष्टपणे लेखात म्हटले आहे.

अतिआत्मविश्वास नडला; आरएसएसच्या मुखपत्रातून भाजप नेतृत्वावर आगपाखड !

आरएसएसचे रतन शारदा यांनी आपल्या लेखात भाजपच्या चारशेपार जागांचा उल्लेख केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने आपल्या कामकाजात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. कारण ही निवडणूक अतिआत्मविश्वास असलेले भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी एक रियालिटी चेक आहे. कारण एखादे लक्ष्य हे मैदानावर मेहनत करून गाठले जाते. सोशल मीडियावर पोस्टर आणि सेल्फी शेअर करून हे लक्ष्य गाठता येत नाही. भाजप कार्यकर्ते हे हवेत होते. तर विजय आमचाच होईल, असे मोदी यांनाही वाटत होते.

follow us

वेब स्टोरीज