‘जोपर्यंत समाजात भेदभाव, तोपर्यंत आरक्षण…’ सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
Mohan Bhagwat on Reservation : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नागपूर येथे आरक्षणावर मोठे विधान केले आहे. जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण कायम राहिले पाहिजे. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांना जातीच्या आधारावर भेदभावामुळे आरक्षण मिळते. मंडल आयोगाच्या शिफारशींनंतर ओबीसींनाही आरक्षण मिळाले, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.
मोहन भागवत म्हणाले की, “आपण समाजव्यवस्थेत आपल्याच माणसांना मागे ठेवले आहे. आपण त्यांची काळजी घेतली नाही आणि हे 2000 वर्षे चालू राहिले. जोपर्यंत आपण त्यांना समानता प्रदान करत नाही तोपर्यंत काही विशेष उपाययोजना कराव्या लागतील. आरक्षण हे त्यापैकीच एक आहे. या कारणास्तव जोपर्यंत भेदभाव आहे तोपर्यंत आरक्षण चालू ठेवावे. आरएसएसचा संविधानात दिलेल्या आरक्षणाला पूर्ण पाठिंबा आहे.
Maratha Reservation : अखेर सरकारने तोडगा शोधलाच! पिढीजात पुरावा द्या अन् दाखला घ्या…
सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, हे केवळ आर्थिक किंवा राजकीय समानता सुनिश्चित करण्यासाठी नाही तर सन्मान देण्यासाठी देखील आहे. भेदभावाचा सामना करणार्या समाजातील काही घटकांना 2000 वर्षे समस्यांचा सामना करावा लागला आहे, तर मग आपण (ज्यांनी भेदभावाचा सामना केला नाही) आणखी 200 वर्षे काही समस्यांना तोंड का देऊ शकत नाही?
‘मराठा समाजाची दिशाभूल करु नका, आरक्षण द्यायचं असेल तर…’ जितेंद्र आव्हाडांचा सांगितला मार्ग
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणामुळे वातावरण तापले आहे. 7-8 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली गावात आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात लाठीचार्ज झाल्यानं मराठा समाज आणखीनच आक्रमक झाला होता. यानंतर आता धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दाही तापला. आजपासून धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी चौंडी येथे बेमुदत उपोषण सुरू केलं आहे.