Download App

लोकप्रिय उर्दू शायर मुनव्वर राणा यांचे निधन, वयाच्या ७१ व्या वर्षी मालवली प्राणज्योत

  • Written By: Last Updated:

Munawwar Rana passed away : प्रसिद्ध उर्दू शायर आणि कवी मुनव्वर राणा (Munawwar Rana) यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुनव्वर राणा हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून लखनऊच्या पीजीआय रुग्णालयात (PGI Hospital) उपचार सुरू होते. मात्र, उपचारदरम्यान, रविवारी (दि. 14 जानेवारी) ला रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.

Prajakta Gaikwad : प्राजक्ताने केले नवं फोटोशुट, गुलाबी गाऊनमध्ये खुललं सौंदर्यं. 

गेल्या वर्षभरापासून मुनव्वर राणा यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना लखनऊच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, मुनव्वर राणा किडनीच्या दीर्घ आजाराने त्रस्त असून आठवड्यातून तीन वेळा त्यांना डायलिसिस करावे लागत होते. नुकताच त्यांना न्यूमोनियाही झाला होता. राणा यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. वडिल मुनव्वर हे व्हेंटिंलेटरवस असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मुलगी सुमैया राणा यांनी दिली होती.

मिलिंद देवरा यांनी भगवं उपरण घातलं! पण दक्षिण मुंबई एवढी सोपी नाही… 

दरम्यान, राणा यांची मुलगी आणि सपा नेत्या सुमैया राणा यांनी सांगितले की, माझे वडील मुनव्वर राणा यांची प्रकृती गेल्या दोन-तीन दिवसांपासून खराब होती. डायलिसिस दरम्यान पोटात दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना पित्ताशयाचा त्रास होता. त्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. यानंतर त्यांना व्हेंटिलेटर सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आलं होतं.

तिनदा आला हृदयविकाराचा झटका
मुलगी फाजिया राणा यांनी सांगितले की, त्यांना तीनदा हृदयविकाराचा झटका आला. ऑपरेशननंतर त्यांची प्रकृती सुधारत होत होती. त्यांनी जेवणही केलं. मात्र काल शनिवारी दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर रविवारी संध्याकाळी त्यांना दुसरा हृदयविकाराचा झटका आला आणि काही वेळातच रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांना तिसरा हृदयविकाराचा झटका आला. तिसऱ्या हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.

‘मा’वरील कविता लोकांना खूप आवडली.

उर्दू साहित्य आणि कवितेतील त्यांचे योगदान, विशेषतः त्यांच्या गझलांना सर्वत्र मान्यता मिळाली. त्यांच्या आईवरील गझला लोकांना विशेष आवडल्या.

मुनव्वर राणा आणि वाद

2022 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ते म्हणाले होते, ‘योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मी उत्तर प्रदेश सोडेन. दिल्ली किंवा कोलकाता येथे जाईल. तर ‘सबका साथ सबका विकास’चा नाऱ्यानं कोणताच विकास झालेला नाही. दिल्ली, कोलकाता आणि गुजरात अधिक सुरक्षित आहेत.

पुरस्कार केला परत
मुनव्वर राणा हे प्रसिद्ध शायर आणि कवी होते. त्यांचा जन्म 1952 मध्ये रायबरेली येथे झाला होता. उर्दू व्यतिरिक्त त्यांनी हिंदी आणि अवधी भाषांमध्येही कविता केल्या. जगभरातील अनेक मुशायऱ्यांमध्ये त्यांचा सहभाग होता. 2014 मध्ये, त्यांना उर्दू साहित्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. याशिवाय 2012 मध्ये त्यांना ‘माटी रतन सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरम्यान, मुनव्वर यांनी वर्षभरानंतरच आपला पुरस्कार सरकारला परत केला होता. वाढत्या असहिष्णुतेमुळे पुन्हा कधीही सरकारी पुरस्कार न स्वीकारण्याची शपथही त्यांनी घेतली होती.

follow us

संबंधित बातम्या