Download App

Porter Turned Into A Unicorn : पोर्टरचा नवा विक्रम, ठरली वर्षाची तिसरी युनिकॉर्न कंपनी 

Porter Turned Into A Unicorn :  टायगर ग्लोबल-समर्थित लॉजिस्टिक सेवा देणारी पोर्टर कंपनी आता युनिकॉर्न कंपनी ठरली आहे. कंपनीने फ्रेंड्स आणि

Porter Turned Into A Unicorn :  टायगर ग्लोबल-समर्थित लॉजिस्टिक सेवा देणारी पोर्टर (Porter) कंपनी आता युनिकॉर्न (Unicorn) कंपनी ठरली आहे. कंपनीने फ्रेंड्स आणि फॅमिली राऊंड पूर्ण केल्यानंतर युनिकॉर्नमध्ये बदलली आहे. कंपनीने 1 बिलियनच्या मुल्यांकनाचे  कर्मचारी स्टॉक ओनरशिप प्लॅन (ESOP) पूलमधून शेअर्स (Shares) खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.

युनिकॉर्न म्हणजे अशी कंपनी ज्याचा बाजारमूल्य 1 अब्ज किंवा त्याहून अधिक असते.  देशातील पहिली युनिकॉर्न कंपनी 2007 मध्ये स्थापन झालेली InMobi कंपनी आहे. माहितीनुसार, आपल्या देशात 106 युनिकॉर्न कंपन्या आहे.

AI स्टार्टअप Crutrim आणि B2B SaaS कंपनी Perfios नंतर पोर्टर हा या वर्षीचा तिसरा युनिकॉर्न ठरला आहे. सध्या 15-20 व्यक्तींनी पोर्टरमध्ये 25 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 2014 मध्ये पोर्टरची स्थापना करण्यात आली होती. आता याचा 500 दशलक्षपेक्षा जास्त मूल्य झाले आहे.

कंपनीने टायगर ग्लोबल, पीक XV पार्टनर्स, KA कॅपिटल, महिंद्रा ग्रुप आणि लाइटरॉक सारख्या गुंतवणूकदारांकडून एकूण 150 दशलक्ष कोटी रुपये जमा केले आहे.  कंपनीचा महसूल FY22 मध्ये  848 कोटींवरून FY23 मध्ये दुप्पट होऊन 1,754 कोटी झाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी देखील  पोर्टरने  फ्रेंड्स आणि फॅमिली राऊंड अंतर्गत 2023 च्या जानेवारी-मार्च तिमाहीत  ESOP पूलमधून 7-8 कोटी रुपयांचे शेअर्स फ्रेंड्स आणि फॅमिलीला विकले होते ज्याचे मूल्य आताप्रमाणे 700 दशलक्ष होते.

तर दुसरीकडे इक्विटी मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म कपिटाच्या डेटानुसार, स्टॉक ओनरशिप प्लॅन म्हणजेच ESOP कॅशआउट्सने 2021 ते 2023 दरम्यान स्टार्टअप कर्मचाऱ्यांच्या हातात 1.46 अब्ज संपत्ती दिली आहे. ESOPs चा फायदा घेत अनेक कर्मचारी मोठी गुंतवणूक करत आहे. Zomato पासून पेटीएम ते दिल्लीवरी, अनेक नवीन-युगाच्या IPO ने मिळून कर्मचाऱ्यांच्या मनातील ESOPs ची धारणा बदलली आहे.

दिलासा मिळणार ! ‘या’ दिवशी केरळात दाखल होणार मान्सून

पोर्टर एक इंट्रासिटी लॉजिस्टिक स्टार्टअप आहे. पोर्टर सध्या देशातील सर्वात मोठे इंट्रासिटी लॉजिस्टिक मार्केटप्लेस आहे, जे सामान्य लोक तसेच व्यावसायिक लोकांपर्यंत उत्पादने वितरीत करते. सध्या पोर्टर 16 शहरांमध्ये 50 लाख ग्राहकांना सेवा देत आहे.

follow us

वेब स्टोरीज