लोकांच्या संतापानंतर झोमॅटोचा 24 तासांत यु-टर्न : डिलिव्हरी पर्सनच्या सुरक्षेसाठी ‘प्युअर व्हेज’ स्पेशल सेवा मागे
मुंबई : शुद्ध शाकाहारी ग्राहकांना फुड डिलिव्हरी करणाऱ्या रायडर्सना हिरव्या रंगाचा टी-शर्ट देण्याचा निर्णय झोमॅटो कंपनीने (Zomato) अवघ्या 24 तासांमध्ये मागे घेतला आहे. त्यामुळे आता झोमॅटोचे सर्व डिलिव्हरी पर्सनन्स पूर्वीप्रमाणेच लाल पोषाखात दिणार आहेत. पोषाखातील बदलानंतर झालेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे झोमॅटोचे प्रमुख दीपिंदर गोयल (deepinder goyal) यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. (Zomato has reversed its decision to issue green T-shirts to its staff delivering food to pure vegetarian customers.)
नेमका काय झाला होता वाद?
फुड डिलिव्हरी सर्व्हिस कंपनी झोमॅटोने नुकतीच शाकाहारी ग्राहकांसाठी ‘प्युअर व्हेज मोड’ सेवा सुरू केली होती. या सेवेमध्ये शाकाहारी ग्राहकांना फुड डिलिव्हरी करणारे डिलिव्हरी पर्सन हिरव्या रंगाचा पोषाख घालणार होते. या नव्या पोषाखाचे फोटो शेअर करत दीपिंदर गोयल यांनी या सेवेबाबत माहिती दिली होती. मात्र या निर्णयावर युजर्सकडून आणि ग्राहकांकडून प्रचंड टीका झाली.
On that note, just stepping out to deliver some pure veg orders with @rrakesh_15 with our newly launched Pure Veg Fleet. See ya! pic.twitter.com/Q4HdhyDMFN
— Deepinder Goyal (@deepigoyal) March 19, 2024
झोमॅटोच्या डिलिव्हरी पर्सनन्सचे पोषाख वेगवेगळे ठेवल्यास लाल पोषाख घालणाऱ्या डिलिव्हरी पर्सनला मांसाहारी अन्न पुरविणारे म्हणून लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. एखादी सोसायटी किंवा परिसरात कपड्याच्या रंगांवरून संबंधित डिलिव्हरी पर्सन मांसाहारी सेवा देतो की शाकाहारी हे कळू शकणार आहे. त्यावरुन संबंधित ग्राहक किंवा पर्सनला हेटाळणीला सामोरे जावे लागू शकते, असा आक्षेप युजर्स आणि ग्राहकांकडून घेण्यात आला होता.
Update on our pure veg fleet —
While we are going to continue to have a fleet for vegetarians, we have decided to remove the on-ground segregation of this fleet on the ground using the colour green. All our riders — both our regular fleet, and our fleet for vegetarians, will…
— Deepinder Goyal (@deepigoyal) March 20, 2024
त्यानंतर आता स्वतः दीपिंदर गोयल यांनी ट्विट करुन हा निर्णय मागे घेत असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, आमचे सर्व रायडर्स आमचा नेहमीचा लाल रंगाचा टी-शर्ट परिधान करतील, ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच अॅपवरती त्यांची ऑर्डर शाकाहारी आहे की मांसाहारी आहे, याबाबत कल्पना येऊ शकेल. आम्हाला आमच्या रायडर्सची शारीरिक सुरक्षा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, असेही त्यांनी सांगितले.