Download App

न्यूजक्लिक फंडिंग प्रकरणात वेबसाइटच्या संस्थापकला अटक, 46 जणांची चौकशी

Newsclick Raid: दिल्लीत अनेक पत्रकार आणि लेखकांच्या घरी पोलिसांच्या विशेष पथकाने छापे टाकले होते. त्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी डिजिटल न्यूज वेबसाइट न्यूजक्लिकच्या (Newsclick) फंडिंग प्रकरणी वेबसाइटचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ (Prabir Purkayastha) आणि अमित चक्रवर्ती (Amit Chakraborty) यांना अटक केली आहे. अधिकाऱ्यांना सांगितले की, पोलिसांच्या स्पेशल सेलने विदेशी निधीच्या तपासासंदर्भात छापा टाकल्यानंतर न्यूज पोर्टलचे कार्यालय सील केले आहे.

पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंत प्रबीर पुरकायस्थ आणि अमित चक्रवर्ती या दोन आरोपींना स्पेशल सेलमध्ये नोंदवण्यात आलेल्या UAPA प्रकरणाच्या संदर्भात छापेमारी, जप्ती आणि कोठडीच्या संदर्भात अटक करण्यात आली आहे. एकूण 37 पुरुष संशयितांची चौकशी करण्यात आली तर 9 महिला संशयितांची त्यांच्या निवासस्थानी चौकशी करण्यात आली. या कालावधीत मोबाईल, लॅपटॉप आणि कागदपत्रे इत्यादी तपासासाठी जप्त/संकलित करण्यात आली आहेत.
उद्योजक पुनीत बालन यांच्यावर महापालिकेची कारवाई; जाहिरातीप्रकरणी तब्बल तीन कोटींचा दंड

दरम्यान दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मंगळवारी दहशतवादविरोधी कायदा बेकायदेशीर UAPA अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यूजक्लिक आणि पत्रकार अभिसार शर्मा आणि उर्मिलेश आणि इतरांशी संबंधित 30 घरी छापे टाकले होते. चीनकडून फंडिंग प्रकरणी मिळाल्याच्या आरोपानंतर न्यूजक्लिकवर ही कारवाई करण्यात आली आहे.

Tags

follow us