Download App

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई! राकेश किशोर यांची प्रॅक्टिस स्थगित

practice suspended of Rakesh Kishor सरन्यायाधीशांवर बूट फेकणारे वकील राकेश किशोर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

practice suspended of Rakesh Kishor for threw shoes at the Chief Justice Bhushan Gavai : सोमवारी 6 ऑक्टोबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक घटना घडली आहे. (CJI) सुनावणी दरम्यान धक्कादायक घटना घडली. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. सुप्रीम कोर्टात वकिलाकडून सुनावणी दरम्यान बूट फेकण्याचा प्रयत्न झाला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वकिलाला वेळीच रोखलं. आता या वकिलाविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच बार कॉउन्सिल ऑफ इंडियाने प्रॅक्टिस स्थगित केली आहे.

सोन्याने रेकॉर्ड मोडलं! 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1.20 लाख रुपयांवर

याबाबत बार कौन्सिल ऑफ इंडियाने एक पत्रक जारी केलं आहे.ज्यामध्ये त्यांनी 1961 च्या एडव्होकेट कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावर बूट फेकणाऱ्या फेकणारे वकील राकेश किशोर यांच्यावरती तात्काळ शिस्तभंगाची कारवाई केली जात आहे. ज्या अंतर्गत त्यांची प्रॅक्टिस स्थगित केली जात आहे. त्यामुळे आता या निलंबन कालावधीमध्ये त्यांनी कोणत्याही न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करू शकत नाही. तसेच या प्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले आहे ज्याला त्यांनी पंधरा दिवसांमध्ये उत्तर देणे अपेक्षित आहे.

अहिल्यानगरच्या कन्येची गगनभरारी! राष्ट्रीय पातळीवरील बॉक्सिंगमध्ये खुशी जाधवला सुवर्णपदक

त्यांच्यावर झालेली ही कारवाई भारतीय कायद्यानुसार कंटेंट ऑफ कोर्ट 1971 नुसार जर एखादी व्यक्ती न्यायालयाच्या मर्यादांच्या उल्लंघन करत असेल.हवामान कारक वर्तन करत असेल न्यायाच्या प्रक्रियेमध्ये अडथळा आणत असेल.तर त्याला शिक्षा होऊ शकते.संविधानाच्या कलम 129 नुसार सर्वोच्च न्यायालयाला हा अधिकार आहे की ते न्यायालयाच्या अवमानासंबंधीच्या प्रकरणांमध्ये स्वतः कारवाई करू शकते.

बिहार विधानसभा निवडणुकांचा ‘शंखनाद’; 6 अन् 11 नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान; 14 नोव्हेंबरला निकाल

अशाप्रकारे न्यायालयाचा अवमान करणाऱ्या व्यक्तीला सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा दोन हजार रुपयांपर्यंत दंड किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात.दुसरीकडे या कायद्यामध्ये दिलासा देखील देण्यात आला आहे.जर आरोपीने त्याची चूक स्वीकार केली किंवा माफी मागितली. त्यानंतर न्यायालयाला त्याचा हा पश्चाताप खरा आहे. असं वाटलं तर यातील त्याचे शिक्षा कमी केली जाऊ शकते किंवा ही शिक्षा रद्द देखील केली जाऊ शकते.अन्यथा ही शिक्षा भोगणे हा एकच पर्याय आरोपीकडे असतो.

follow us