अहिल्यानगरच्या कन्येची गगनभरारी! राष्ट्रीय पातळीवरील बॉक्सिंगमध्ये खुशी जाधवला सुवर्णपदक

Khushi Jadhav हिने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत अंतिम सामन्यात भारतीय पोलिस संघाच्या खेळाडूचा पराभव करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.

Khushi Jadhav

Khushi Jadhav of Ahilyanagar wins gold medal in national level boxing competition : चेन्नई येथे भारतीय बॉक्सिंग महासंघाने, पहिली बी एफ आय कप, बॉक्सिंग टूर्नामेंट 2025 चे आयोजन दिनाक 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीत केले होते. या स्पर्धेत अहिल्या नगर जिल्हा बॉक्सिंग संघटनेची खेळाडू खुशी दीपक जाधव, हिने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व 54 किलो वजन गटात केले. तिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत दिल्ली, हरियाणा, गुजरात व भारतीय पोलिस संघाच्या खेळाडूंचा एकतर्फी पराभव करीत अंतिम स्पर्धेत प्रवेश केला व अंतिम सामन्यात भारतीय पोलिस संघाच्या खेळाडूचा पराभव करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.

बिहार विधानसभा निवडणुकांचा ‘शंखनाद’; 6 अन् 11 नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान; 14 नोव्हेंबरला निकाल

खुशी ही सिनियर गटात सुवर्ण पदक घेणारी अहिल्या नगर जिल्ह्याची किंबहुना महाराष्ट्राची प्रथम बॉक्सर ठरली आहे. तिच्या माध्यमातून महाराष्ट्राला पहिले सुवर्णपदक मिळाले आहे.

धैर्य, जिद्द आणि सामर्थ्याची प्रेरणादायी गाथा मर्दिनी” आता मोठ्या पडद्यावर !

डॉक्टर जाधव कुटुंबीया साठी ह्या दिवाळीसाठी हा डबल धमाका ठरला आहे कारण खुशी जाधव हिची बहीण कु ईश्वरी सचिन जाधव हिस राष्ट्रीय शालेय स्पर्धेत ह्या वर्षी रौप्य पदक मिळाले आहे. ती सुद्धा कर्नल परब ची विद्यार्थिनी आहे. त्याबद्दल तिचे जिल्हा बॉक्सिंग संघटनेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

बॉलिवूडमध्ये मराठीचा जलवा! अभिजीत सावंतची जादू, मराठमोळ्या गाण्याने जिंकली प्रेक्षकांची मने

खुशी हिस दुसऱ्या इयत्तेत असल्यापासून कर्नल परब स्कूल मध्ये कर्नल परब की जे भारतीय सेनेतील एक उत्कृष्ट बॉक्सर होते त्यांचे व परब मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तिने चवथ्या वर्गात असताना कब क्लास या गटात सुवर्ण पदक मिळवून सुरुवात केली व अनेक वर्ष सातत्यपूर्ण खेळ करून आज वरिष्ठ गटात सुवर्ण पदक प्राप्त केले.

सरन्यायाधीश भूषण गवईंवर बूट फेकणाऱ्याला काय शिक्षा होणार? कायदा काय सांगतो? जाणून घ्या…

आतापर्यंत तिला अहमदनगर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे प्रमुख शकील सर व पुणे येथील माजी ऑलिम्पिक खेळाडू माननीय मनोज पिंगळे सर यांचे मार्गदर्शन लाभले. गेल्या पाच वर्षापासून ती स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) यांचे औरंगाबाद येथील केंद्रामध्ये प्रशिक्षण घेत आहेत. तेथे तिला भारतातील विविध उच्चशिक्षित प्रशिक्षकांचे प्रशिक्षण मिळत आहे. खुशीच्या या यशाबद्दल तिच्यावर अहिल्यानगर मधील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

follow us