भोपाळ : भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Sadhvi Pragya Singh Thakur) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेला मुलगा हा कधीच देशभक्त होऊ शकत नाही. राहुल गांधी हे परदेशात बसून सांगत आहेत की, आम्हाला संसदेत बोलण्याची संधी मिळत नाही. यापेक्षा लज्जास्पद काहीही असू शकत नाही. मला अशा राहुलचा तिरस्कार आहे. त्यांना आता राजकारणात संधी देऊ नये. त्यांना देशाबाहेर हाकलले पाहिजे, अशा शब्दात त्यांनी राहुल गांधींचा समाचार घेतला. त्यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
भोपाळच्या खासदार काल भोपाळ-दाहोद ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी पोहोचल्या होत्या. त्यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
काँग्रेसवाले सरकारला संसद चालवू देत नाहीत
संसदेत चांगले काम सुरू आहे. सगळं काही ठीकठाक आहे. मात्र, काँग्रेसचे लोक हे सरकार चालवू देत नाहीत आहेत. संसदेचे कामकाज चालू दिले जात नाही. जर संसद चालली तर आणखी काम होईल, असे त्यांना वाटतं. जर जास्त कामे झाली तर आपले अस्तित्व टिकणार नाही अशी त्यांना भीती आहे. त्यांचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, परंतु त्यांची बुद्धिमत्ता देखील दूषित होत आहे. तुम्ही (राहुल गांधी) तुमच्या देशाचे नेते आहात. तुम्हाला जनतेने निवडून दिले आहे. तुम्ही जनतेचा आणि देशाचा अपमान करत आहात.
तुम्ही भारतातील नाहीच, आम्ही मान्य केलं आहे, कारण तुमच्या आई ह्या ईटलीच्या आहेत. हे आम्ही म्हणत नाही, चाणक्य सांगतो, की, परदेशी स्त्रीच्या पोटी जन्मलेला मुलगा कधीही देशभक्त होऊ शकत नाही. चाणक्यांनी जे म्हटलंय तसचं राहुल गांधी वागत आहेत. तरीही संसदेने आणि भारतातील जनतेने तुम्हाला खासदार म्हणून निवडून दिलं. आणि आता तुम्हीचं अशी वक्तव्यं करत आहात. काँग्रेसचे सरकार इतकी वर्षे होते. तुम्ही देश उद्ध्वस्त केलात. संसदेत आम्हाला सबोलण्याची संधी मिळत नाही, असं राहुल गांधी विदेशात सांगतात. यापेक्षा लज्जास्पद काहीही असू शकत नाही. मला अशा राहुल गांधींचा तिरस्कार आहे.
देशाबाहेर हाकलून दिले पाहिजे
खासदार म्हणाल्या, राहुल गांधी देशाचे राजकारण कसे करतात यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले पाहिजे. त्यांना आता राजकीय संधी देऊ नये. त्यांना देशाबाहेर हाकलले पाहिजे.
काँग्रेस मोदींची कबर खोदण्यात व्यस्त अन् पंतप्रधान मोदी…