काँग्रेस मोदींची कबर खोदण्यात व्यस्त अन् पंतप्रधान मोदी…
बंगळूरु : काँग्रेस मोदींची कबर खोदण्यात व्यस्त आहे तर आपलं सरकार लोकांचं जीवन सुसह्य करण्यात व्यस्त असल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला लगावला आहे. कर्नाटक दौऱ्यावर असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला खडेबोल सुनावले आहेत.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते 118 किमी लांबीच्या बंगळुरू-म्हैसूर एक्सप्रेसवेच्या प्रकल्पाचे उद्घाटन झालं. यावेळी ते बोलत होते.
Rohit Pawar : ‘राम शिंदे छोट्या मनाचे नेते, त्यांचे ऐकू नका मला निधी द्या’
पंतप्रधान मोदी म्हणाले, 2014 साली जनतेने मतदान करुन सेवा करण्याची संधी दिली, त्यानंत देशात गरीबांच्या वेदना समजून संवेदनशील सरकार स्थापन झाले आहे. भाजपने पूर्ण प्रामाणिकपणे गरिबांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. दुहेरी इंजिन सरकार विकासाच्या माध्यमातून लोकांचे प्रेम परत करण्याचा सतत प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
ईडीला कोर्टात खेचणार, जेलभरो आंदोलन करणार; छापेमारीच्या टायमिंगवर अंधारे भडकल्या
2014 पूर्वी केंद्रातील काँग्रेस सरकारने गरीब कुटुंबांना उद्ध्वस्त करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. जो पैसा गरिबांच्या विकासासाठी होता, तो हजारो कोटी रुपये काँग्रेस सरकारने लुटला. काँग्रेसने गरिबांच्या दु:खाची कधीच पर्वा केली नसल्याचंही मोदींनी स्पष्ट केलंय.
सुषमा अंधारेंनी केली सोमय्यांची पोलखोल; सोमय्यांनी त्रास दिलेल्या नेत्यांची यादीच वाचली
तसेच पायाभूत सुविधा केवळ सुविधा घेऊन येत नाहीत. त्यातून रोजगार मिळतो, गुंतवणूक येते आणि त्यातून कमाईचे साधन येते. मागील वर्षांचा दाखला देत मोदी म्हणाले, एकट्या कर्नाटकात आम्ही महामार्गांशी संबंधित प्रकल्पांमध्ये 1 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, कर्नाटकात बेंगळुरू आणि म्हैसूर ही दोन महत्त्वाची शहरे मानली जातात. हा एक्स्प्रेसवे सुरू झाल्यानंतर आता दोन्ही शहरांमधील अंतर अवघ्या ७५ मिनिटांत कापले जाणार आहे. तर पूर्वी दोन शहरांमध्ये प्रवास करण्यासाठी तीन तास लागत असल्याचं ते म्हणाले आहेत.