Download App

तेलंगणा जिंकण्यासाठी पंतप्रधान मोदींचा ‘मास्टरस्ट्रोक’; 13 हजार 500 कोटींच्या पॅकेजची घोषणा

तेलंगणामध्ये आगामी निवडणुक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी एक मास्टरस्ट्रोक मारला आहे. तेलंगणातील मेहबूबनगरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी राज्याला 13 हजार 500 कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. आगामी निवडणुकीत तेलंगणा राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर इंडिया आघाडीचं मोठं आव्हान उभं असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी प्रकल्पांची घोषणा केल्याचं दिसून येत आहे.

NCP Crisis : शरद पवार गटानं हेरलं अजितदादांचं ‘ते’ वाक्य; आता टाकणार पॉवरफुल्ल डाव?

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, पुढील दिवस सणांचे असणार आहेत. सणासुदीला सुरुवात झाली असून नवरात्रीचा सण काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. नारी शक्ती वंदन कायद्याची पारित करुन आम्ही आधीच शक्तीपूजा प्रस्थापित केली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

अफगाणने दिल्लीतील दूतावासाचा गाशा गुंडाळला, राजदूताने भारत सोडला

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तेलंगणा दौऱ्यादरम्यान, रस्ते, रेल्वे, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि उच्च शिक्षण अशा महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, 13,500 कोटी रुपयांच्या प्रकल्पांसाठी मी तेलंगणाचे अभिनंदन करतो.

Nitin Gadkari : ‘निवडणुकीत पोस्टर, बॅनरबाजी अन् चहापाणी करणार नाही’; नितीन गडकरींचं मोठं विधान

आज असे अनेक रस्ते जोडणी प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत, जे लोकांच्या जीवनात मोठे बदल घडवून आणतील. देशातील अनेक मोठे आर्थिक कॉरिडॉर तेलंगणातून जात आहेत. सर्व राज्यांना पूर्व आणि पश्चिम किनार्‍यांशी जोडण्याचे हे माध्यम बनणार असल्याचा विश्वासही मोदींनी यावेळी व्यक्त केला आहे.

कोल्हापूर : उत्तरेवर भाजपचा दावा, राजेश क्षीरसागरांची दक्षिणेत चाचपणी; दोन्ही घरचा पाहुणा उपाशी राहणार?

तसेच नागपूर-विजयवाडा कॉरिडॉरद्वारे तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील वाहतूक सुरळीत होणार आहे, त्यामुळे तिन्ही राज्यांतील व्यापार, पर्यटन आणि उद्योगाला चालना मिळणार आहे, आज मी तेलंगणाच्या भूमीवरून घोषणा करत आहे की केंद्र सरकारने हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या गरजा लक्षात घेऊन राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना केली असल्याचं ते म्हणाले आहे.

दरम्यान, तेलंगणातील जनतेला बदल हवा आहे, कारण त्यांना खोटी आश्वासने नको आहेत, तर ठोस काम हवे आहे, भाजप तेलंगणातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी कटिबद्ध आहे. तेलंगणाला बदल हवा आहे कारण इथे भाजपचे सरकार हवे आहे. राज्याला बदल हवा आहे कारण त्याला भ्रष्ट सरकार नको आहे, तर पारदर्शक आणि प्रामाणिक सरकार हवे असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Tags

follow us