Download App

Vibrant Gujarat Summit : ‘जे बोलतो ते पूर्ण होतं’; PM नरेंद्र मोदींनी दिली जनतेला गॅरेंटी

Image Credit: letsupp

Vibrant Gujarat Summit : मी जे बोलतो पूर्ण होत असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी देशातील जनतेला पुन्हा गॅरंटी दिली आहे. गुजरातमधील गांधीनगरमध्ये व्हायब्रंट गुजरात शिखर संम्मेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यता येणार आहे. यंदाच्या गुजरात परिषदेत ‘गेटवे टू द फ्यूचर’ ही थीम असणार आहे. या परिषदेत 34 देशांसह 16 सहभागी होणार आहे.

नगरसाठी शरद पवारांचं काय ठरतंय? ढाकणे, तनपुरे की आणखी कोण? लवकरच फैसला

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली असून भारत पुढील 25 वर्षांच्या उद्दिष्टांवर काम करत आहे. भारत स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरे करेल तोपर्यंत भारत विकसित करण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे. हा 25 वर्षांचा कार्यकाळ भारताचे अमृतकाळ आहे. या अमृतकाळामध्ये ही पहिली व्हायब्रंट गुजरात समिट होत असल्याने त्याचे महत्त्व आणखी वाढले असल्याचं मोदींनी स्पष्ट केलं आहे.

Bade Mian Chote Mian: खिलाडी अन् टायगर श्रॉफच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ रिलीजच्या तयारीत!

या परिषदेला यूएईचे राष्ट्रपती या कार्यक्रमाला उपस्थित राहणे ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची बाब असून प्रमुख पाहुणे म्हणून त्यांची उपस्थिती भारत आणि यूएई यांच्यातील घनिष्ठ संबंधांचे प्रतिक आहे. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल परिषदेसाठी आत्मनिर्भर भारतासाठी समृद्ध गुजरातच्या व्हिजनसह नवीन उंची गाठत राहणार आहे. या शिखर परिषदेने नवीन विचारांना एक व्यासपीठ दिले आहे. गुंतवणुकीसाठी आणि परताव्यासाठी गेटवे तयार केले आहेत. परिषदेच्या माध्यमातून एकविसाव्या शतकातील जगाचे भवितव्य आपल्या संयुक्त प्रयत्नातूनच उज्ज्वल होणार असून भारताने आपल्या G20 अध्यक्षपदाच्या काळात जागतिक भविष्यासाठी एक रोडमॅप देखील दिला असल्याचं मोदी म्हणाले आहेत.

आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून येत्या काही वर्षांत भारत जगातील पहिल्या 3 अर्थव्यवस्थांमध्ये असणार आहे. अशावेळी जेव्हा जग अनेक अनिश्चिततेने वेढलेले आहे. तेव्हा भारत जगासमोर आत्मविश्वासाचा नवा किरण म्हणून उदयास आला असून भारताचा विकास करणे हे आमचे ध्येय आहे. तुमची स्वप्ने मोदींचा संकल्प असल्याचंही मोदींनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, आज वेगाने बदलणाऱ्या जागतिक व्यवस्थेत भारत पुढे जात आहे. समान ध्येय ठेऊन ध्येय साध्य करु शकणार असल्याचा विश्वास भारताने जगाला दिला आहे. भारताची वचनबद्धता, निष्ठा, प्रयत्न, परिश्रम आजचे जग अधिक सुरक्षित आणि समृद्ध करत असल्याचंही मोदींनी सांगितलं आहे.

follow us

वेब स्टोरीज