Download App

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला न जाणं ही चूक? प्रियांका गांधी म्हणाल्या, ‘भाजपने निमंत्रण…’

प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला न जाऊन आम्ही काही चुकी केली आहे, असे वाटत नाही. त्यांनी राजकीय कार्यक्रम बनवलं होतं- प्रियांका गांधी

Priyanka Gandhi : जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्य (Narendra Modi) हस्ते अयोध्येतील मंदिरातील रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली होती. आयोजकांनी या कार्यक्रमाचे कलाकार, क्रिकेटपटू आणि राजकीय नेत्यांना आमंत्रणे पाठवली होती. मात्र या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे विरोधकांनी पाठ फिरवली होती. त्यामुळं सातत्याने कॉंग्रेससह (Congress) अन्य विरोधी पक्षांवर भाजपकडून टीका केली जात आहे. दरम्यान, यावर आता कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधींनी (Priyanka Gandhi) भाष्य केलं.

सांगलीच्या खासदारकीसाठी पैज लावणं पडलं महागात; पोलिसांकडून दुचाकी ताब्यात घेत गुन्हाही दाखल 

विरोधक राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गैरहजर राहिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते भाजपच्या अनेक नेत्यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही भाजपने या मुद्द्यावरून काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसनेया कार्यक्रमाला उपस्थित न राहणे ही सत्ताधाऱ्यांनी चूक मानली. याविषयी प्रियांका गांधींना विचारले असता त्या म्हणाल्या की, जर तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहण्यास सुरुवात केली तर तुम्ही काहीही बोलू शकता, काहीही टीका करू शकता, अगदी धर्मावरही टीका करू शकता. पण, आमच्यासाठी धर्म हा राजकीय मुद्दा नाही. धर्म हा प्रत्येक भारतीयाच्या मनातला मुद्दा आहे. राम, कृष्ण किंवा भगवान शिव हे प्रत्येक भारतीयांच्या मनात आहे. धर्म असो की श्रद्धा, त्याचा आदर केला पाहिजे, असं त्या म्हणाल्या.

देशात परिवर्तन अटळ! जनता भाजप आणि मित्रपक्षांचा सुफडा साफ करणार; कॉंग्रेस नेत्याचा दावा 

पुढं बोलतांना त्या म्हणाल्या की, प्रत्येक भारतीयाच्या मनातील आस्थेचा आदर व्हायला हवा. आम्ही तो आदर करतो. राम मंदिरात झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला न जाणं ही आमची चूक नव्हती. तुम्ही राजकीय दृष्टीकोनातून बघताय, म्हणून तुम्हाला तसं वाटतं असेल, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

प्रियांका गांधी म्हणाल्या, भाजपने आम्हाला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण दिलं होतं. आम्ही त्या निमंत्रणाचा आदरच करतो. आम्ही आमच्या अधिकृत निवेदनात ते स्पष्ट केलं होतं. कारण जिथे आस्था आहे, तिथं आम्ही आदर करतो. कारण आम्ही या देशाचे, या देशातील लोकांचे प्रतिनिधी आहोत. पण, त्या कार्यक्रमाला न जाऊन आम्ही काही चुकीचे केले आहे, असे मला वाटत नाही. त्या घटनेला त्यांनी राजकीय कार्यक्रम बनवलं होतं, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

 

follow us