सांगलीच्या खासदारकीसाठी पैज लावणं पडलं महागात; पोलिसांकडून दुचाकी ताब्यात घेत गुन्हाही दाखल
Case filed on Youngster due to betting on Sangali MP forecasting : सध्या देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. याच दरम्यान राज्यातील सांगली ( Sangali MP ) हा मतदारसंघ महाविकास आघाडीतील उमेदवारीच्या वादावरून चांगलाच चर्चेत राहिला. त्यामध्ये काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंडखोरी करत ही निवडणूक अपक्ष लढवली. त्यामुळे महायुतीचे विद्यमान खासदार राहिलेल्या संजय काका पाटील आणि विशाल पाटील यांच्यात झालेल्या या लढतीत कोण बाजी मारणार? हे आता चार जूनलाच ठरेल.
मात्र या दरम्यान सांगलीचा खासदार नेमका कोण होणार याबद्दल पैज लावणं दोन तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे. या तरूणांनी सांगलीचा खासदार कोण होणार? यासाठी पैज लावली होती. मात्र पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. त्यामुळे या दोघांवर थेट जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना ताब्यात देखील घेण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण ? शिंदेंना टेन्शन वाढवणारे फडणवीस यांचे उत्तर
सांगलीतील कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगावचे ग्रामपंचायत सदस्य रमेश संभाजी जाधव आणि शिरढोण येथील गौस मुबारक मुलाणी या दोघांनी सांगलीचा खासदार कोण होणार? यासाठी पैज लावली होती. यासाठी हे दोघे एकमेकांना आपले बुलेट आणि युनिकॉर्न या गाड्या देणार होते. त्यासाठी त्यांनी समाज माध्यमावर तसा संदेशही दिला.
मात्र पोलिसांना ही माहिती कळताच त्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेत त्यांच्या दोन लाख पंधरा हजार रुपये किमतीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत तसेच दोघांवर जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे सांगलीच्या खासदारकीसाठी लावण्यात आलेली ही पैज या दोन तरुणांना चांगलीच महागात पडले आहे.