1 एप्रिलपासून नियम कडक, अंड्यावर उत्पादन व एक्सपायरी तारीख बंधनकारक

1 एप्रिलपासून राज्यात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक अंड्यावर उत्पादनाची तारीख आणि एक्स्पायरी डेट छापणे बंधनकारक असणार आहे.

Untitled Design 41

Untitled Design 41

Production and expiry dates on eggs are mandatory : अंडी खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत अनेकांच्या आहारात अंड्यांना विशेष स्थान आहे. मात्र, आपण रोज खात असलेली अंडी किती दिवसांपूर्वीची आहेत, याची माहिती ग्राहकांना मिळत नव्हती. यामुळे आरोग्याशी संबंधित धोके निर्माण होत होते. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील पशुसंवर्धन विभाग आणि अन्न सुरक्षा विभागाने नवीन नियम लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. 1 एप्रिलपासून राज्यात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक अंड्यावर उत्पादनाची तारीख आणि एक्स्पायरी डेट छापणे बंधनकारक असणार आहे. यामुळे दुकानदारांना जुनी किंवा खराब अंडी ‘ताजी’ म्हणून विकता येणार नाहीत. मुख्य पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंड्याचा थेट संबंध मानवी आरोग्याशी आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी शिळी अंडी विकली जात असल्याच्या तक्रारी होत्या

ग्राहकांना त्याची माहिती नसल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवत होत्या. नव्या नियमांमुळे अंड्यांच्या विक्रीत पारदर्शकता येणार असून ग्राहकांना सुरक्षित अंडी मिळण्यास मदत होईल. अंडी किती दिवस सुरक्षित राहतात, याबाबत देखील स्पष्टता देण्यात आली आहे. साधारण 30 अंश सेल्सियस तापमानात अंडी सुमारे दोन आठवड्यांपर्यंत खाण्यायोग्य राहतात. मात्र जर अंडी 2 ते 8 अंश सेल्सियस या थंड तापमानात साठवली, तर ती सुमारे पाच आठवडे सुरक्षित राहू शकतात. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी अंड्यांचंही योग्य साठवणूक होत नसल्याने ग्राहकांसाठी धोका वाढत होता.

महिलांनो लक्ष द्या, गॅस सिलिंडरचं टेन्शन कायमचं मिटलं! आता ATM मशीनमधून मिळणार भरलेला गॅस

आता मात्र अंड्यावर छापलेली तारीख पाहून अंडी खरेदी करणे सोपे होणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. संबंधित दुकानदारांची अंडी जप्त केली जातील किंवा नष्ट केली जातील. तसेच ती मानवी सेवनासाठी अयोग्य असल्याचे स्पष्टपणे चिन्हांकित केले जाईल. याबाबत संबंधित विभागांकडून कठोर तपासणी करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. यापूर्वी अंडी किती कुणी आहेत, याचा अंदाज लावावा लागत होता.

अनेक वेळा शिळी अंडी खाल्ल्यामुळे आरोग्य बिघडण्याच्या घटना घडत होत्या. आता मात्र ग्राहकांना अंड्यावरची एक्स्पायरी डेट पाहून योग्य निर्णय घेता येईल. उत्तर प्रदेशात अन्नसुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण निर्णय मानला जात आहे. लवकरच हा नियम राज्यभर कडकपणे लागू केला जाणार असून, विक्रेते आणि उत्पादकांना त्यासाठी तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Exit mobile version