Download App

भारताच्या प्रयत्नांना मोठे यश, कतारमधील नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांची फाशी रद्द

  • Written By: Last Updated:

Relief For 8 Ex Indian Navy Officers On Death Row In Qatar : कतारमध्ये (Qatar) काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या भारतीय नागरिकांना कतार न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. हे आठही भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी (Retired Officer of Indian Navy) होते. मात्र या आठही नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांची फाशीची शिक्षा रद्द करण्यामध्ये भारताच्या प्रयत्नांना मोठे यश आलं आहे.

चहा विकणाऱ्यांना देश विकताना रेडहॅन्ड पकडलंय! कन्हैय्या कुमारचा पीएम मोंदींवर हल्लाबोल

या सर्व अधिकाऱ्यांच्या फाशीच्या शिक्षेला कतार सरकारकडून आता जन्मठेपेच्या शिक्षेमध्ये बदलण्यात आलं आहे. एमइए यांनी याविषयी एक पत्रक जारी करत यासंदर्भात माहिती दिली की, दाहरा ग्लोबल प्रकरणांमध्ये कतारच्या न्यायालयाने निर्णय दिला आहे, ज्यामध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या भारताच्या माजी आठ अधिकाऱ्यांची शिक्षा ही आता जन्मठेपे मध्ये बदलण्यात आली आहे. यावेळी न्यायालयामध्ये कतार मधील भारताचे राजदूत आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

काय आहे नेमकं प्रकरण?

कतारमध्ये अल दाहरा या खासगी कंपनीत काम करणाऱ्या भारतीय नागरिकांना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कथित हेरगिरी प्रकरणात अटक करण्यात आली होती. गेल्या वर्षी ऑगस्टपासून ते कतारच्या तुरुंगात आहे. दरम्यान कतार न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. भारत सरकारने या माजी नौसैनिकांच्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले होते. त्यानंतर अखेर या प्रकरणामध्ये भारताच्या प्रयत्नांना यश आलं आहे.

नितीश कुमार मोठा निर्णय घेणार? PM पदावरुन इंडिया आघाडीत घुसमट; अद्याप सस्पेन्स कायम…

ऑगस्ट 2022 मध्ये भारतीय नौदलाचे माजी अधिकारी पूर्णेंदू तिवारी, सुगुनाकर पाकला, अमित नागपाल, संजीव गुप्ता, नवतेज सिंग गिल, बिरेंद्र कुमार वर्मा, सौरभ वशिष्ठ आणि रागेश गोपकुमार यांना अटक करण्यात आली होती. समोर आलेल्या माहितीनुसार, या सर्वांवर कतारच्या एका गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे.

follow us