Download App

Video : पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिका दौऱ्यात ट्रम्प यांच्यासमोरच अदानींवर प्रश्न, काय दिलं उत्तर?

अदानी यांच्याबद्दल उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत एक लोकशाही आहे आणि आपली संस्कृती "वसुधैव कुटुंबकम" आहे,

  • Written By: Last Updated:

PM Narendra Modi US Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यामध्ये अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर मोदी आणि ट्रम्प यांची एक संयुक्त पत्रकार परिषद जाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान मोदी यांना उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत दाखल झालेल्या खटल्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा झाली का? असं विचारण्यात आलं. त्यावर मोदी यांनी उत्तर दिलं आहे.

पहिल्याच भेटीत भारताला मोठं यश; पंतप्रधान मोदी-ट्रम्प यांच्यात बैठक, मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील

अदानी यांच्याबद्दल उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत एक लोकशाही आहे आणि आपली संस्कृती “वसुधैव कुटुंबकम” आहे, आम्ही संपूर्ण जगाला एक कुटुंब मानतो. प्रत्येक भारतीय माझा आहे असे मला वाटते. दोन देशांचे दोन सर्वोच्च नेते कधीही अशा वैयक्तिक मुद्द्यांवर चर्चा करत नाहीत.

अदानी यांच्यावरील आरोप

२०२४ मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळात अमेरिकेच्या न्याय विभागाने दाखल केलेल्या खटल्यात गौतम अदानी यांच्याविरुद्ध गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आरोपांनुसार, सौरऊर्जेच्या करारांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी अदाणी यांनी भारतीय अधिकाऱ्यांना सुमारे २,१०० कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केले आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, हे व्यवहार अमेरिकन बँका आणि गुंतवणूकदारांपासून लपवून ठेवण्यात आले होते ज्यांच्याकडून अदाणी समूहाने अब्जावधी डॉलर्स उभारले आहेत.

ट्रम्प यांचे आदेश

लाचखोरीचे आरोप समोर आल्यानंतर आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांनी, एका कार्यकारी आदेशाद्वारे न्याय विभागाला अदाणी समूहाची चौकशी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जवळजवळ अर्धशतक जुन्या कायद्याची अंमलबजावणी थांबवण्याचे निर्देश देण्यात आले होते.

follow us

संबंधित बातम्या