Rahul Gandhi : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी विरोधकांच्या फोन हॅकींगच्या मुद्दा आणि अदानींच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरलं आहे. सध्या विरोधकांकडून आरोप करण्यात येत आहे. की अदानी समुहावर प्रश्न उपस्थित केल्याने विरोधकांचे फोन हॅक केले जात आहेत. त्यावर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार निशाणा साधला.
…म्हणूनच विरोधकांचे फोन हॅक
यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, आम्ही अदानीच्या मुद्द्यावर सरकारला एवढं घेरलं आहे. त्यामुळे ते हेरगिरी करू लागले आहेत. तर सरकारमध्ये अदानी क्रमांक एक, मोदी दोन आणि अमित शाह हे तीन क्रमांकवर आहेत. मात्र तुम्ही कितीही हेरगिरी करा आम्ही मागे हटणार नाही. असं देखल यावेळी राहुल गांधी म्हणाले आहेत.
Sanjay Raut : अजितदादांना राजकीय डेंग्यू, फडणवीसांनी राजीनामा द्यावा; राऊतांचा हल्लाबोल
तसेच यावेळी राहुल यांनी अनेक विरोधी पक्षांतील नेत्यांच्या फोनवर कंपनीकडून आलेल्या सुचनांचे मेल दाखवले आहेत. त्यामध्ये लिहिण्यात आले आहे. की, राज्य पुरस्कृत लोकांकडून त्यांचे फोन हॅक केले जात आहेत. सगळ्या विरोधकांना तसा संदेश आला आहे. त्यामुळे कितीही हॅक करा. वाटलं तर माझाही फोन घेऊन जा. असंस देखील यावेळी राहुल गांधी म्हणाले.
दरम्यान लोकसभेच्या वेबसाइटवरील लॉगइन आयडी आणि पासवर्ड उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांनी दिल्याचे मान्य केल्यानंतर खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सरकार आपला फोन आणि ई मेल हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. मला अॅपल कंपनीकडून अलर्ट आणि ई मेल मिळाला की सरकार माझा फोन आणि ई मेल हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे, असा खळबळजनक आरोप मोईत्रा यांनी केला. त्यांच्या या आरोपांनंतर खळबळ उडाली आहे. यानंतर सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.