Sanjay Raut : अजितदादांना राजकीय डेंग्यू, फडणवीसांनी राजीनामा द्यावा; राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut : अजितदादांना राजकीय डेंग्यू, फडणवीसांनी राजीनामा द्यावा; राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) राज्यात ठिकठिकाणी आंदोलन हिंसक बनले आहे. मराठवाड्यात या आंदोलनाची धग जास्त आहेत. बसेसची तोडफोड आणि लोकप्रतिनिधींच्या घरांवर हल्ले झाले आहेत. या सगळ्या घडामोडींवर विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फैलावर घेतले आहे. राऊत यांनी दोन्ही मंत्र्यांवर घणाघाती टीका केली. राज्यात मराठा आंदोलनाचा भडका उडालेला असताना फडणवीस छत्तीसगड येथे प्रचारात व्यस्त होते. तर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना (अजित पवार) राजकीय डेंग्यू झाला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला. राऊत म्हणाले, फडणवीस स्वतःला जबाबदार आणि कर्तबगार समजतात. राज्यांची खडा न् खडा माहिती आहे. राज्य पेटलेले असताना ते राज्यात नाहीत. देवेंद्र फडणवीसांकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी आहे. गृहमंत्रीपदाची जबाबदारी असलेला नेता राज्य सोडून कसा जाऊ शकतो, असा सवाल राऊत यांनी उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांनी आता राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली. आंदोलकांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली पाहिजे. गृहमंत्री ज्या पद्धतीने बेदरकारपणे वागत आहेत, त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी जळजळीत टीका राऊत यांनी फडणवीस यांच्यावर केली.

Maratha Reservation : CM शिंदेंचा फोन; कापत्या आवाजात जरांगेंनी सांगितलं नेमकी काय चर्चा झाली….

दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना राजकीय डेंग्यू 

यानंतर त्यांनी अजित पवार यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना डेंग्यू झाला आहे. ते या प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना कोणता मच्छर चावला आणि डेंग्यू झाला, असा खोचक सवाल राऊत यांनी केला. यानंतर राऊत यांनी आमदार अपात्रता प्रकरणावरही भाष्य केले. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर या पदासाठी अपात्र आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अपात्र ठरवले पाहिजे. ज्या पद्धतीने ते चालढकल करत आहेत ज्या पद्धतीने संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाला मानत नाहीत अशी व्यक्ती कोणत्याही घटनात्मक पदावर असेल तर ती अपात्रच आहे. त्यांना अपात्रच केले पाहिजे, असे राऊत म्हणाले.

जरांगेंना मदत करणं आमदार पुत्राच्या अंगलट; ‘फोन पे’ वरून येणाऱ्या चिल्लर पैशांमुळे वैतागला

मुख्यमंत्री अपयशी, राजीनामा द्या

शिंदे गटाचे खासदार राजीनामा देण्याचे ढोंग करत आहेत. खासदारांना मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देता येतो का असा सवाल आहे. खरं म्हणजे, आरक्षणाच्या प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा दिला पाहिजे. कारण त्यांच्या राज्यात हिंसाचार होत आहे. भाजपाने एकनाथ शिंदेंना यासाठी मु्ख्यमंत्री केलं. काय तर म्हणे मराठा चेहरा. इथे मराठ्यांच्या तोंडाला फेस आलाय. मराठा मरतोय. मराठा जळतोय. एक मराठा मुख्यमंत्री अपयशी ठरतोय. हा कसला फेस आहे. त्यामुळे भाजपा 2024 च्या निवडणुकीत पराभूत होणार आहे आणि त्याचं श्रेय शिंदे आणि अजित पवार या दोन मराठा नेत्यांना जाईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube