जरांगेंना मदत करणं आमदार पुत्राच्या अंगलट; ‘फोन पे’ वरून येणाऱ्या चिल्लर पैशांमुळे वैतागला

  • Written By: Published:
जरांगेंना मदत करणं आमदार पुत्राच्या अंगलट; ‘फोन पे’ वरून येणाऱ्या चिल्लर पैशांमुळे वैतागला

सोलापूर : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा आक्रमक झाले असून, गेल्या सात दिवसांपासून त्यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसलं आहे. तीव्र आंदोलनापूर्वी जरांगे पाटलांनी राज्यतील विविध भागात जात सभा घेतली होती. जरागेंची सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदार संघात सभा झाली होती. या सभेला अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार बबनराव शिंदेंच्या (MLA Babanrao Shinde) मुलाने आर्थिक मदत केल्याचे रेकॉर्डिग व्हायरल झाले आहे. त्यानंतर येथील मराठा तरूणांनी फोन पे च्या माध्यमातून आमदार पुत्राला चिल्लर देण्यास सुरूवात केली आहे. रूपया, दोन रुपये आणि पाच रूपयांमध्ये येणाऱ्या रकमेमुळे आमदार पुत्र रणजितसिंह शिंदे हैराण झाले आहेत. (Maratha Youth Sending Money To MLA Babrao Shinde’s Son By Using Phone Pe )

Maratha Reservation : CM शिंदेंचा फोन; कापत्या आवाजात जरांगेंनी सांगितलं नेमकी काय चर्चा झाली….

नेमकं काय झालं होतं?

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटलांनी राज्याभर फिरत सभा घेतल्या होत्या. 5 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या सोलापूर दौऱ्यादरम्यान जरांगे पाटलांच्या मंगळवेढा, बार्शी, कुर्डुवाडी, पंढरपूर तालुक्यांच्या ठिकाणी सभा झाल्या. शिवाय पंढरपूर येथील जरागेंची सभा पार पडली. या सभेला माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांच्या मुलाने म्हणजे रणजितसिंह शिंदे याने मदत आर्थिक मदत केली. या संबंधीची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. यामुळे येथील मराठ तरूणांनी आक्रमक होत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

Sanjay Raut : ‘मुख्यमंत्री अपयशी, त्यांनी राजीनामा द्यावा’; राऊतांनी केली मागणी

फोन पेद्वारे चिल्लर रक्कम पाठवण्यास सुरूवात

जरांगेच्या सोलापूर दौऱ्यावेळी पार पडलेल्या सभांना आमदार पुत्राने आर्थिक मदत केल्याच्या निषेधार्थ येथील चिडलेल्या मराठा तरूणांनी रणजितसिंह शिंदे यांना फोन पे द्वारे एख रूपया, दोन रूपयांसह पाच रूपयांसारखी चिल्लर रक्कम पाठवण्याल सुरूवात केली आहे. ही रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर सतत येणाऱ्या नोटिफिकेशनमुळे आमदार पुत्र रणजितसिंह शिंदे पुरते वैतागले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube