Download App

राहुल गांधींना धक्का! ‘आप’ने सोडला काँग्रेसचा हात, केली मोठी घोषणा

Rahul Gandhi : लोकसभा निवडणुकीत देशाची राजधानी दिल्लीमधील सातही जागांवर झालेल्या पराभवानंतर आम आदमी पक्षाने मोठा निर्णय घेत काँग्रेससोबत

Rahul Gandhi : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) देशाची राजधानी दिल्लीमधील (Delhi) सातही जागांवर झालेल्या पराभवानंतर आम आदमी पक्षाने (AAP) मोठा निर्णय घेत काँग्रेससोबत (Congress) असणारी युती तोडण्याची घोषणा केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाने घेतल्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा झटका बसणार आहे.

आपचे जेष्ठ नेते गोपाल राय (Gopal Rai) यांनी याबाबत घोषणा केली आहे. गोपाल राय म्हणाले, आम आदमी पक्ष काँग्रेससोबत निवडणूक लढवणार नाही ही युती फक्त लोकसभा निवडणुकीसाठी होती आम्ही विधानसभा निवडणुकीत एकटेच लढणार आहे.

आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या घरी पक्षाचे सर्व आमदार आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि आगामी विधानसभा निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना गोपाल राय यांनी पक्ष विधानसभा निवडणूक एकटा लढवणार असल्याची घोषणा केली.

गोपाल राय पत्रकारांशी बोलताना म्हणाले, काँग्रेससोबतची युती फक्त लोकसभा निवडणुकीसाठी होती. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ही युती नाही. आम्ही दिल्ली विधानसभा निवडणूक एकटेने लढू आणि जिंकू असं पत्रकारांशी बोलताना गोपाल राय म्हणाले.

12 लाखांच्या ‘या’ शानदार कारवर मिळत आहे 2.5 लाख रुपये वाचवण्याची संधी; जाणून घ्या ऑफर

इंडिया आघाडीत आम आदमी पार्टीचा देखील समावेश आहे. दिल्लीतील लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने काँग्रेससोबत युती केली होती मात्र दिल्लीतील सातही  जागांवर भाजपने विजय मिळवला. आम आदमी पक्षाने 7 पैकी 4 तर काँग्रेसने तीन जागांवर निवडणूक लढवली होती.

follow us

वेब स्टोरीज