Download App

राहुल गांधी बनले मास्टरशेफ; तामिळनाडूतील फॅक्टरीत बनवले चॉकलेट

Rahul Gandhi : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा याआधी खूप चर्चेत होती. आपल्या दौऱ्यात त्यांनी देशाच्या विविध भागातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. नुकताच राहुल गांधी यांचा बाईक रायडर अवतार लडाखमध्ये पाहायला मिळाला. आता राहुल गांधी शेफच्या रुपात दिसले आहेत. राहुल गांधी तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी उटी येथील चॉकलेट फॅक्टरीला भेट दिली आणि स्वतःच्या हाताने कँडी बनवली.

राहुल गांधींनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 7 मिनिटांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ते उटी येथील चॉकलेट फॅक्टरीत कँडी बनवताना आणि जीएसटीवर चर्चा करताना दिसत आहेत.

राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड येथील त्यांच्या लोकसभा मतदारसंघात जाताना निलगिरीमध्ये वसलेल्या प्रसिद्ध हिल टाऊनला भेट दिली. व्हिडिओ शेअर करताना राहुल गांधी म्हणाले, ‘मुरलीधर राव आणि स्वाती या जोडप्याचा या छोट्या व्यवसायामागील उद्योजकीय भावना प्रेरणादायी आहे. त्यांच्यासोबत काम करणारी संपूर्ण महिला टीमही तितकीच उल्लेखनीय आहे. 70 महिलांची ही टीम मी आजपर्यंत टेस्ट केलेली सर्वोत्तम कॉउचर चॉकलेट्स बनवते.

मुंबई-गोवा महामार्गाचं काम का होत नाही? राज ठाकरेंनी समजावूनच सांगितलं…

जीएसटीला ‘गब्बर सिंग टॅक्स’ असे संबोधून राहुल गांधी म्हणाले, ‘भारतभरातील असंख्य लहान आणि मध्यम उद्योगांना गब्बर सिंग टॅक्सच्या ओझ्याने ग्रासले आहेत.’ राहुल गांधींनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आरोप केला की ‘असे दिसते आहे. एमएसएमई क्षेत्राचे नुकसान करताना सरकार मोठ्या कंपन्यांची बाजू घेत असल्याचे दिसते.

Tags

follow us