मुंबई-गोवा महामार्गाचं काम का होत नाही? राज ठाकरेंनी समजावूनच सांगितलं…

मुंबई-गोवा महामार्गाचं काम का होत नाही? राज ठाकरेंनी समजावूनच सांगितलं…

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई -गोवा महामार्गाचं काम रखडल्याची परिस्थिती आहे. या महामार्गासाठी आत्तापर्यंत 15 हजार कोटी रुपये खर्च करुनही अद्याप महामार्ग पूर्णत्वास न आल्याने या विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेनंतर मनसेचे प्रमुख राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी छोटेखानी सभा घेत हा महामार्ग का होत नाही? याबद्दल समजावूनच सांगितलं आहे.

पोलिस दिसताच चौघांनी थेट अंगावरच गाडी घातली, जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणची घटना

राज ठाकरे म्हणाले, कोकणी बांधवांना आणि भगिनींना मागील अनेक वर्षांपासून खड्डे सहन करावे लागत आहेत. याचा राग कसा येत नाही? तुम्ही त्याच त्याच लोकांना मतदान करता आणि तेच तेच लोक तुमच्या आयुष्याचा खेळ करतात. रस्त्यावर पडलेला खड्डा भरता येतो माणसाचं आयुष्य भरुन काढता येत नाही. जे लोकं खड्ड्यांमुळे गेली त्यांचं काय? मागच्या पंधरा वर्षांमध्ये अडीच हजार माणसं या खड्ड्यांमुळे मृत पावली आहेत, हे धक्कादायक असल्याचं ठाकरे म्हणाले आहेत.

खळबळजनक! भाजप खासदाराच्या घरी फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला 10 वर्षीय मुलाचा मृतदेह

तसेच सातत्यानं कंत्राटं काढायची, बिलं उचलायची आणि खड्डे तसेच ठेवायचे, हे वर्षानुवर्षे सुरुच आहे. मुंबई-पुणे रस्त्याचं स्वप्न बाळासाहेबांनी बघितलं ते पूर्ण झालं. महाराष्ट्र हा पुढारलेलाच होता. या हायवेमुळे देशाला कळलं की असा रस्ता होऊ शकतो. नितीन गडकरींनी या रस्त्यासाठी परिश्रम घेतले.

खळबळजनक! भाजप खासदाराच्या घरी फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला 10 वर्षीय मुलाचा मृतदेह

आज त्याच महाराष्ट्रातला मुंबई-गोवा रस्ता असा झाला आहे. हे असं का झालं? रस्ता का होत नाहीये? उत्तर सोपं आहे तुम्हाला राग येत नाही. मेल्या मनाचे झालेलो आहोत आम्ही. त्यामुळे ही अवस्था झाली आहे. भावनेच्या आधारावर आपण मतदान करतो, त्यामुळे असे हाल आहेत. हा रस्ता असा ठेवण्यामागे सगळ्यात महत्त्वाचं कारण कोकणी बांधवांच्या जमिनी विकत घेतल्या जात आहेत. ज्यावेळी रस्ता होईल तेव्हा शंभर पट भावाने व्यापाऱ्यांना जमिनी विक्री होतील, तुम्हाला काहीही मिळणार नसल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, रस्ता चांगला झाल्यानंतर आजूबाजूच्या जमिनींचे भाव काय होतात? हे समजून घ्या. जमिनी विकू नका, तशाच ठेवा पुढे तुम्हाला फायदा होईल. जमिनी बळकावणारांचं काय करायचं? हे आम्ही बघू, असा इशारा ठाकरे यांनी दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube