Download App

राहुल गांधींनी केंब्रिजच्या वक्तव्यावर सोडलं मौन, म्हणाले…

नवी दिल्ली : काँग्रेसचे (Congress)माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi)यांनी लंडनमध्ये (London)केलेल्या वक्तव्यावर मौन सोडलं आहे. संसदेच्या आत आणि बाहेर भाजप (BJP)नेत्यांकडून राहुल गांधींनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी (Apologize)अशी मागणी केली जात आहे. त्यावरून सलग चौथ्या दिवशी संसदेत (Parliament)गदारोळ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. आता राहुल गांधींनी पहिल्यांदाच त्यावर भाष्य केलं आहे.

आज राहुल गांधी संसदेच्या अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होणार आहेत. याच कारणावरून राहुल आज गुरुवारी दुपारी संसद भवनात पोहोचले. संसद भवनात पोहोचल्यावर तिथं उपस्थित पत्रकारांनी राहुल गांधींना विचारलं की, ते माफी मागणार का? त्यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, मी लंडनमध्ये भारतविरोधी काहीही बोललो नाही. त्यांनी मला संधी दिली तर मी संसदेत उत्तर देईल असंही यावेळी गांधी म्हणाले.

मुलीच्या लग्नाचं वय १८ ऐवजी २१ होणार, ‘इतक्या’ वर्षांनी कायदा होणार लागू

त्यावरुन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. खरगे म्हणाले की, पंतप्रधान जेव्हा जेव्हा देशाबाहेर गेले तेव्हा त्यांनी देशाविरोधात बोलून जनतेचा अपमान केला आहे. बेरोजगारी आणि महागाईचा मुद्दा बाजूला ठेवून भाजपचे खासदार राहुल गांधींचे लोकशाहीवादी भाषण जनतेला दाखवत आहेत, असंही खरगे म्हणाले.

दुसरीकडं या मुद्द्यावरून राहुल गांधींवर भाजप सातत्यानं हल्लाबोल करत आहे. केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, जर राहुल गांधींनी देशाची बदनामी केली तर, या देशाचे नागरिक म्हणून आम्ही गप्प बसणार नाही. जर कोणी देशाची बदनामी केली तर देश त्याला कधीच माफ करणार नाही.

राहुल गांधी लंडनमध्ये जाऊन खोटे बोलले. संसदेत ते दिलेल्या वेळेपेक्षा जास्त बोलले. सभागृहाचे नियम मोडून खोटे बोलले. राहुल म्हणतात की, देशात जाऊन बोलू शकत नाही, त्यांना थांबवलं जातं.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात गदारोळ सुरू आहे. राहुल गांधींचं वक्तव्य आणि अदानी प्रकरणाबाबत बुधवारी सत्ताधारी आणि विरोधक आपापल्या मुद्द्यांवर ठाम राहिले. संसदेच्या दोन्ही सभागृहात तिसऱ्या दिवशीही गोंधळाचं वातावरण होतं.

Tags

follow us