Rahul Gandhi On Pm Narendra Modi : परमात्मा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या आत्म्याशी बोलत असल्याचं म्हणत काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बरसले आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर संसदेच्या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यात आली. शपथविधीनंतर लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची आवाजी मतदान पद्धतीने निवड झाली. त्यानंतर आता संसदेच्या कामकाजाला सुरुवात झालीयं. यावेळी संसदेत बोलताना राहुल गांधी एनडीए सरकारच्या कामकाजावरुन पंतप्रधान मोदींवर बरसले आहेत.
#WATCH | Leader of Opposition in Lok Sabha, Rahul Gandhi says, "…The PM says that (Mahatma) Gandhi is dead and Gandhi was revived by a movie. Can you understand the ignorance?… Another thing I noticed is that it is not just one religion that talks about courage. All religions… pic.twitter.com/2N3NdYHNw8
— ANI (@ANI) July 1, 2024
राहुलं गांधी म्हणाले, भारत देशाचे विचार, संविधान आणि संविधानावर हल्ला होत असताना, विरोध करणाऱ्या लोकांवर हल्ला केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट देवाशी संबंध असून परमात्मा थेट मोदी यांच्या आत्म्याशी बोलत असल्याची टीका राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना केलीयं.
तसेच पंतप्रधान मोदी म्हणतात की, महात्मा गांधी मृत पावले आहेत आणि गांधींना एका चित्रपटाद्वारे पुर्नजिवित केलं आहे. आता तुम्ही अज्ञानतेला समजू शकता का? आणखी एक गोष्ट मी पाहिलीयं की फक्त धर्म साहसाची गोष्ट करीत नाही तर सर्वच धर्म साहसची गोष्ट करीत आहेत. आमच्यावर व्यक्तिगत स्वरुपात हल्ले केले जात आहेत. काही नेते अद्यापही जेलमध्ये आहेत. ज्यांनी सत्ता आणि धनाबाबत गरीब, दलित आणि अल्पसंख्यांकांवर आक्रमणाच्या विचारांचा विरोध केलायं त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं असल्याचं राहुल गांधींनी स्पष्ट केलंय. दरम्यान, आपल्या सर्वच महापुरुषांनी अहिंसा आणि भीती संपवण्याची भाषा केलीयं. मात्र, जे लोकं स्वत:ला हिंदू म्हणवून घेत आहेत ते फक्त हिंसा आणि असत्याची गोष्ट करीत आहेत तुम्ही हिंदू आहात की नाही? असा उपरोधिक सवालही राहुल गांधी यांनी यावेळी केलायं.
संसदेचं सध्या अधिवेशन सुरु असून या अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने भाजपवर हल्ला करताना दिसत आहे. याआधीही त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलायं. भाजपवर हल्ला करताना राहुल गांधी यांनी सभागृहात भगवान शिवचे चित्र दाखवत भाजप विरोधात आम्हाला लढण्यास मदत झाली, मात्र दुसरीकडे त्यांनी जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते नेहमीच हिंसाचार करतात असं देखील म्हटले आहेत. राहुल गांधी यांच्या विधानावर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आक्षेप घेतला. तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केलीयं. यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, मी भाजप, आरएसएस आणि मोदींना हिंसक म्हटले आहे. संपूर्ण हिंदू समाजाला नाही. राहुल यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, हा मुद्दा गंभीर आहे. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे गंभीर बाब आहे. त्यावर राहुल गांधी म्हणाले, मोदी म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही किंवा आरएसएस म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही. असं राहुल गांधी म्हणाले आहेत.