Rahul Gandhi Defamation Case : गुजरात HC चा राहुल गांधींना मोठा धक्का, पुनर्विचार याचिका फेटाळली

Rahul Gandhi Defamation Case: मोदी आडनावाशी संबंधित बदनामी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. राहुल गांधी यांच्या 2 वर्षांच्या शिक्षेविरोधात दाखल करण्यात आलेली पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे राहुल गांधींच संसद सदस्यत्व बहाल केले जाणार नाही आणि सुनावण्यात आलेली शिक्षाही कायम राहणार आहे. सत्र, जिल्हा न्यायालय आणि […]

Rahul Gandhi 1

Rahul Gandhi 1

Rahul Gandhi Defamation Case: मोदी आडनावाशी संबंधित बदनामी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. राहुल गांधी यांच्या 2 वर्षांच्या शिक्षेविरोधात दाखल करण्यात आलेली पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे राहुल गांधींच संसद सदस्यत्व बहाल केले जाणार नाही आणि सुनावण्यात आलेली शिक्षाही कायम राहणार आहे. सत्र, जिल्हा न्यायालय आणि हायकोर्ट या तीनही ठिकाणी राहुल गाधींना दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे आता या शिक्षेविरोधात राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणा का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सुप्रीम कोर्टाने जर राहुल गांधींना या प्रकरणात दिलास दिला नाही तर, राहुल  गांधींना तुरूंगात जावे लागू शकते. गुजरात उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता वायनाड येथे पोट निवडणूक लागणार का हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आत्ता 44 प्लसचा आकडा, आगे आगे देखो.., आमदार अनिल पाटलांनी व्यक्त केला विश्वास

लोकसभा निवडणुकीपूर्वी 13 एप्रिल रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘मोदी आडनाव’ वर वादग्रस्त विधान केले होते. त्यावर सुरतच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने 23 मार्च रोजी गुजरातमधील भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी दाखल केलेल्या 2019 प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 499 आणि 500 ​​(फौजदारी मानहानी) अंतर्गत राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यानंतर 24 मार्च रोजी राहुल गांधी यांचे खासदारकी रद्द करण्यात आली.

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! नीलम गोऱ्हे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार

या सर्व प्रकरणावर राहुल गांधींनी माफी मागण्यास नकार दिल्यानंतर 27 मार्च रोजी राहुल यांना सरकारी बंगला सोडण्याची नोटीस देण्यात आली. त्यानुसार 22 एप्रिल रोजी राहुल गांधींनी सरकारी निवास्थान रिकामे केले होते. त्यानंतर राहुल गांधींतर्फे या प्रकरणाबाबत सुरत सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राहुल गांधींनी गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, मात्र येथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. यानंतर उच्च न्यायालयात या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी अपील करण्यात आले होते.

घटनाक्रम नेमका कसा?

13 एप्रिल 2019 : कर्नाटकातील कोलारमध्ये राहुल गांधींनी मोदी आडनावाबाबत हल्लाबोल करणारे वक्तव्य केले होते. त्यानंतर या प्रकरणी पुर्णेश मोदी यांनी याचिका दाखल केली होती.

23 मार्च 2023 : सुरत कोर्टाने या प्रकरणी राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा सुनावली. या प्रकरणात त्यांना तात्काळ जामीनही मंजूर झाला होता.

24 मार्च 2023 : एखाद्या खासदाराला 2 किंवा त्याहून अधिक मुदतीची शिक्षा झाली तर त्याचे संसदेचे सदस्यत्व जाते. राहुल गांधी यांची शिक्षा जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले होते.

7 जुलै 2023 : गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधींची शिक्षा कायम ठेवत या प्रकरणी दाखल करण्यात आलेली पुर्नविचार याचिका फेटाळून लावली.

Exit mobile version