Rahul Gandhi Government bungalow : 2019 च्या मोदी आडनाव बदनामी प्रकरणात दोषी ठरल्यानंतर लोकसभा खासदार (Lok Sabha MP) म्हणून काँग्रेस (Congress)नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) अपात्र ठरवण्यात आले. त्यानंतर आता एक महिन्यानंतर गांधींनी शनिवारी त्यांचा अधिकृत बंगला रिकामा केला आहे. एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे की त्यांचे सामान आधीच त्यांच्या अधिकृत निवासस्थानातून त्यांच्या आई सोनिया गांधी (Sonia Gandhi)यांच्या 10 जनपथ येथील घरी हलवण्यात आले होते. आज मात्र अधिकृतरित्या राहुल गांधींनी त्यांचा शासकीय बंगला लोकसभा सचिवालयाकडे (Lok Sabha Secretariat)सुपूर्द केला आहे.
यापूर्वी, राहुल गांधींना वायनाडचे खासदार म्हणून अपात्र ठरवल्यानंतर त्यांना दिलेला सरकारी बंगला 22 एप्रिलपर्यंत रिकामा करण्यास सांगण्यात आले होते, त्यानंतर सुरत न्यायालयाने त्यांना ‘मोदी आडनाव’ टिप्पणी प्रकरणात दोषी ठरवले होते.
#WATCH | "People of Hindustan gave me this house for 19 years, I want to thank them. It's the price for speaking the truth. I am ready to pay any price for speaking the truth…," says Congress leader Rahul Gandhi as he finally vacates his official residence after… pic.twitter.com/hYsVjmetYw
— ANI (@ANI) April 22, 2023
याबाबत राहुल गांधींनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते म्हणाले की, हिंदुस्थानच्या लोकांनी मला हे घर 19 वर्षांसाठी दिले होते, मी त्यांचे आभार मानू इच्छितो. ही खरं बोलण्याची किंमत आहे. मी खरं बोलण्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, राहुल गांधींनी 14 एप्रिल रोजी त्यांचे कार्यालय आणि काही वैयक्तिक सामान बंगल्यातून त्यांच्या आई सोनिया गांधी यांच्या अधिकृत निवासस्थानी हलवले होते. गांधींनी त्यांचे उर्वरित काही सामान शुक्रवारी संध्याकाळी बंगल्यातून बाहेर काढले. एक ट्रक त्यांच्या सामानासह इमारतीच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला.
सुरत न्यायालयाने 23 मार्चला राहुल गांधींना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यातच त्यांची खासदारकीही रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधींनी न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाला सुरत येथील सत्र न्यायालयात आव्हान दिले होते, मात्र त्यांची याचिका फेटाळण्यात आली.