Senior Congress leader Siddaramaiah : मी मुख्यमंत्री झालो तर जनतेला अमूल दूध खरेदी न करण्याचं आवाहन करेल
If I become CM, I will tell people of Karnataka not to buy Amul milk : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीला (Karnataka Assembly Elections) आता अवघ्या 20 दिवसांचा अवधी उरला आहे. सत्ताधारी भाजपने आणि कॉंग्रेसने या निवडणुकीसाठी चांगलीच तयार केली आहे. निवडणुकीपूर्वी कर्नाटकात राजकीय वातावरण चांगलचं पेटलं आहे. राज्यातील राजकीय पक्षांमध्ये दुग्धजन्य पदार्थांचा मुद्दा तापला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धारमैय्या (Senior Congress leader Siddaramaiah) यांनी गुजरातमधील सहकारी डेअरी अमूल आणि कर्नाटकातील नंदिनी यांच्यातील संभाव्य विलीनीकरणाची शक्यता नाकारली आहे. मी मुख्यमंत्री झाल्यावर अमूलचे दूध खरेदी करू नका, असे कर्नाटकातील जनतेला सांगेन, असे विधान माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते सिद्धारमैय्या यांनी केले.
‘मी लोकांना सांगेन अमूलचे दूध घेऊ नका’
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलतांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या म्हणाले, अमूलने सध्याचा ग्राहकवर्ग कायम ठेवला पाहिजे. कर्नाटकात घुसखोरी करून स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न अमूल करत आहे. त्यामुळे अमूलच्या प्रवेशाला आमचा विरोध राहणार आहे. मी मुख्यमंत्री झालो तर लोकांना सांगेन की अमूलचे दूध खरेदी करू नका. विरोधकांची भूमिका बाजारविरोधी नाही, असे सांगून सिद्धारमैय्या म्हणाले, कृत्रिम मागणी निर्माण करणे चांगले नाही. गुणवत्तेच्या तुलनेत कर्नाटकचे नंदिनी हा गुजरातच्या अमूल ब्रॉंड इतकीच चांगला ब्रॅंन्ड आहे, त्यामुळे अमूलने नंदिनीच्या व्यवसायात ढवळाढवळ करू नये. अमूलला नंदीच्या व्यवसायात हस्तक्षेप करू देणार नाही
…खदखद होती तर तेव्हाच सरकारमधून बाहेर पडायचं; नाना पटोलेंनी अजितदादांना सुनावले
गुजरातस्थित सहकारी डेअरी अमूलने 5 एप्रिल रोजी कर्नाटकच्या बाजारपेठेत दूध आणि दही पुरवठा करण्याची घोषणा केल्याने विरोधकांना सत्ताधारी भाजपवर निशाणा साधण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. खरं तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खूप पूर्वीच घोषणा केली होती की दोन डेअरी ब्रँडचे सहकार्य या प्रदेशासाठी चमत्कार करू शकते. त्यानंतर हे प्रकरण पुन्हा ऐरणीवर आले आहे. अमित शहा यांच्याकडे सहकार खातेही आहे. दरम्यान, सिध्दारमैय्या यांनी सांगितले की, गुजरातची अमूल आणि कर्नाटकची नंदिनी हे कुठल्याही प्रकारे विलीनीकरण होणार नाही. आम्ही अमूलला विरोध करणार आहोत. मी मुख्यमंत्री झालो तर लोकांना अमूलचं दूध खरेदी करू नका, असं आवाहन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
विरोधकांचा भाजपवर निशाणा
काँग्रेस आणि जेडीएस या विरोधी पक्षांनी राज्यातील सत्ताधारी भाजपवर पुन्हा निशाणा साधला आहे. कर्नाटक मिल्क फेडरेशन (KMF) ची 21,000 कोटी रुपयांची नंदिनी ही गुजरातमधील सहकारी डेअरी अमूलमध्ये विलीन होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. पण, राज्यातील जनतेचे नंदिनीशी भावनिक नाते आहे.
दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात अंदाज व्यक्त करत सिध्दारमैय्या म्हणाले की, या निवडणउकीत कॉंग्रेस 130 हून अधिक जागांवर बाजी मारेल. मागच्या वेळसारखी त्रिशंकु परिस्थिती उद्भवणार नाही.