Download App

Rahul Gandhi Birthday : 2024 ला राहुल गांधी पंतप्रधान होणार? 53 व्या वाढदिवशी अंकशास्त्र काय सांगतं?

Rahul Gandhi Birthday : आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस आहे. ते आज 53 वर्षांचे झाले आहेत. त्यांचा जन्म 19 जून 1970 रोजी झाला. ते सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. आज 53 व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर राहुल यांच्यासाठी आगामी 2024 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण यावर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे 2024 ला राहुल गांधी पंतप्रधान होणार का? याबद्दल ज्योतिषशास्त्र काय सांगत? पाहूयात… ( Rahul Gandhi Horoscope for 2024 Loksabha Election on his Birthday)

वरिष्ठ IPS अधिकारी रवी सिन्हा यांची RAW प्रमुख म्हणून नियुक्ती

अंकशास्त्रानुसार राहुल गांधी यांचा मूलांक 1 आहे. ज्यावर सुर्याचं अधिपत्य आहे. तर त्यांचा हा मूलांक त्यांची जन्मतारिख 19 पासून तयार होतो. जो सुर्य आणि मंगळाचे गुण घेऊन येतो. तर त्यांचा भाग्यांक 6 आहे जो 33 या योगांकापासून तयार होतो. 3 ऱ्या स्थानी गुरू आणि 6 व्या स्थानी शुक्राचं अधिपत्य असतं. त्याचबरोबर राहुल यांचा नामांक म्हणजे जो नावाच्या अक्षरांच्या क्रमांकावरून काढला जातो. तो 36/9 आहे.

Shiv Sena@57 : बाळासाहेब ठाकरेंसोबत शिवसेना गाजवलेले फायर ब्रँड नेते….

जन्मांक आणि नामांकाचा संबंध :
अंकशास्त्राच्या सिद्धांतानुसार राहुल गांधी यांचा जन्मांक आणि नामांक हा कॉंग्रेसच्या आकड्यांशी साधर्म्य साधणारा नाही. त्यांचा ताळमेळ बसत नाही. तर यामुळेच त्यांच्या आतापर्यंत त्यांच्या राजकीय आणि वैयक्तिक जीवनात भाग्योदय झालेला दिसत नाही.

Pune Crime : पुण्यात पुन्हा कोयता गॅंगची दहशत; सुप्रिया सुळे म्हणाल्या, गृहमंत्री फडणवीसांनी…

राहुल गांधी यांचं व्यक्तिमत्त्व कसं आहे?
राहुल गांधी यांच्या जीवनात 1 आणि 33 या आकड्यांचा योग त्यांना प्रत्येक परिस्थितीमध्ये लढण्याचं सामर्थ्य देतो. परिस्थिती कीतीही वाईट असली तरी देखील प्रत्येक वेळी नवी सुरूवात करण्याची हिंमत त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे.

लंकेंकडून विखे पाटलांचा एकेरी उल्लेख; म्हणाले, तुझ्या पोराला…

राहुल गांधी यांच्यासाठी 2024 कसं असेल?
राहुल यांच्यासाठी आगामी 2024 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं आसणार आहे. कारण या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. येणारं वर्ष राहुल यांच्या जीवनावर परिणाम करणारं ठरणार आहे. 54 व्या वर्षांत पदार्पण करणं हे त्यांच्यासाठी नवीन तपस्येचा काळ आहे. येत्या काळात त्यांना कायदेविषयक आणि आरोग्यविषयक समस्या भेजसावू शकतात. त्यांना त्यांचे जवळचे लोक यावर्षी धोका देण्याती शक्यता आहे. तर वयाच्या 55 व्या वर्षी त्यांच्या जीवनात भाग्योदर आहे. त्यांना जनतेकडून देखील खुप प्रेम मिळेल.

2024 ला राहुल गांधी पंतप्रधान होणार का?
अंकशास्त्रानुसार 2024 मध्ये राहुल गांधी पंतप्रधान होण्याची शक्यता फार कमी आहे. मात्र ते देशाला दुसऱ्या मार्गाने मार्गदर्शन करतील असं देखील सांगण्यात येत आहे.

follow us