RAW ची धुरा छत्तीसगडच्या हातात; जाणून घ्या कोण आहेत रवी सिन्हा

  • Written By: Published:
RAW ची धुरा छत्तीसगडच्या हातात; जाणून घ्या कोण आहेत रवी सिन्हा

केंद्र सरकारने छत्तीसगड केडरचे आयपीएस अधिकारी रवी सिन्हा यांची देशाच्या गुप्तचर संस्थेच्या संशोधन आणि विश्लेषण शाखेचे म्हणजेच RAW च्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.  ते सध्याचे रॉचे प्रमुख  सामंतकुमार गोयल यांची जागा घेणार आहेत. रवी सिन्हा हे छत्तीसगड केडरचे 1988 च्या बॅचचे आयपीएस आहेत. सामंत हे येत्या 30 जून रोजी निवृत्त होत असून, सिन्हा हे दोन वर्षांसाठी रॉ च्या प्रमुखपदी कार्यरत असणार आहेत. सिन्हा सध्या कॅबिनेट सचिवालयात विशेष सचिव पदावर कार्यरत आहेत. (IPS Ravi Sinha Appointed As a New RAW Chief Know All About Him)

कोण आहेत रवी सिन्हा?

▪️ रवी सिन्हा हे 1988 बॅचच्या छत्तीसगड कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत.
▪️ रवी सिन्हा हे विद्यमान रॉ प्रमुख सामंत गोयल (1984 बॅचचे पंजाब कॅडरचे आयपीएस अधिकारी) यांची जागा ▪️ घेतील. सामंत गोयल 30 जून रोजी निवृत्त होत आहेत.
▪️ रवी सिन्हा हे दोन वर्षांसाठी रॉच्या प्रमुखपदी असतील.
▪️ सध्या ते केंद्रीय प्रतिनियुक्तीवर कॅबिनेट सचिवालयात विशेष सचिव पदावर कार्यरत आहेत.

RAW म्हणजे काय?

विदेशी गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी RAW जबाबदार आहे. कोणत्याही देशातील घडामोडींचा भारतावर परिणाम होऊ शकतो, तर RAW त्यावर लक्ष ठेवते. RAW राज्यविहीनांसाठी गुप्तचर ऑपरेशन्स देखील करते. इंदिरा गांधी सरकारमध्ये RAW अस्तित्वात आली. रामेश्वर नाथ काव हे पहिले प्रमुख होते. RAW थेट पंतप्रधानांना अहवाल देतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube