Gandhi Vs Adani : अडाणी समुहात २० हजार कोटी रुपये कसे आले, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी सातत्याने करत आहेत. मात्र, याबाबत संसद अथवा संसदेबाहेर अद्यापपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा भाजपकडून उत्तर दिले जात नाही. जेव्हापासून हिंडेनबर्ग रिपोर्ट आला आहे. तेव्हापासून अडाणी समुहाबद्दल सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहे. परंतु, यावर आता खुद्द अडाणी समूहाने एक निवेदन काढले असून त्यात त्यांनी २० हजार कोटी रुपये कसे, कुठून आले आहेत याचा खुलासा कतर प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
राहुल गांधी यांच्या आरोपांना अडाणी समूहाने प्रथमच उत्तर दिले आहे. एक निवेदन प्रसिद्धीस देत अडाणी समूहाने म्हटले की, आम्ही कंपन्यांमधील हिस्सेदारी विकून २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक वाढवली आहे. शेल कंपन्यांच्या माध्यमातून कंपन्यांमध्ये गुंतवणुकीबाबत चर्चा करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय प्रकाशन समूहाच्या अहवालाचे अडाणी समूहाने खंडन केले आहे. या अहवालाच्या आधारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच अडाणी समूहाला विचारले होते की शेल कंपन्यांच्या माध्यमातून २० हजार कोटी रुपये कसे गुंतवण्यात आले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरोपांना सोमवारी उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अडाणी समूहाने प्रत्युत्तर दिले. शेल कंपन्यांच्या माध्यमातून अडाणी समूहात २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला होता. या आरोपांना प्रत्युत्तर देताना, अडाणी समूहाने सांगितले की, २०१९ पासून अडाणी समूहातील कंपन्यांनी त्यांचे स्टेक विकून $ २.८७ बिलियन (सुमारे २० हजार कोटी रुपये) उभे केले आहेत. ज्यापैकी $ २.५५ बिलियन व्यवसायात पुन्हा गुंतवले गेले आहेत.
आसामचे मुख्यमंत्री आता गांधींविरोधात आक्रमक!… म्हणाले १४ एप्रिलनंतर खेचणार…! – Letsupp
या दरम्यान इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी पीजेएससी (आयएचसी) एक अबू धाबी-आधारित जागतिक धोरणात्मक गुंतवणूक कंपनी, समूह कंपन्यांमध्ये $२.५९३ अब्ज गुंतवणूक केली. अडाणी एंटरप्रायझेस लिमिटेड आणि अडाणी एनर्जी लिमिटेड (एजीईएल) मध्ये ही गुंतवणूक करण्यात आली होती. या कालावधीत, गुंतवणूकदारांनी $२.७८३अब्ज उभारण्यासाठी अडाणी टोटल गॅस लिमिटेड आणि एजीईएलमधील त्यांचे स्टेक विकले. त्यातून जमा झालेली रक्कम अडाणी समूहातील अडाणी एंटरप्रायझेस लिमिटेड, अडाणी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन, अडाणी ट्रान्समिशन आणि अडाणी पॉवर लिमिटेड या कंपन्यांमध्ये पुन्हा गुंतवण्यात आली आहे.
अडाणी समूहाने सोमवारी समूहातील थेट परकीय गुंतवणुकीवरील (एफडीआय) अलीकडील प्रसारमाध्यमांच्या अहवालाचे स्पष्टपणे खंडन केले. तसेच समूहाला संपवण्याची ‘स्पर्धात्मक शर्यत’ असल्याचे म्हटले आहे. लेख प्रकाशित झाल्यानंतर अडाणी समूहाने संबंधित मीडिया हाऊसला पत्र लिहून समूहाने प्रकाशित केलेल्या अहवालातील “मूलभूत गैरसमज” आणि “चुकीचे” निदर्शनास आणून दिले आणि ते त्वरित वेबसाइटवरून काढून टाकण्यास सांगितले आहे.