Download App

मनसेच्या आंदोलनाचा विषय थेट संसदेत…राजेश वर्मांचा थेट राज ठाकरेंवर वार

Rajesh Verma on MNS Raj Thackeray In Parliament : मनसेच्या (MNS) आंदोलनाचा विषय संसदेत गाजला आहे. बिहारमधील खगरिया येथील लोकजनशक्ती पार्टीचे खासदार राजेश वर्मा यांनी (Rajesh Verma) आरोप केला की, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षाचे कार्यकर्ते महाराष्ट्रात उदरनिर्वाहासाठी गेलेल्या हिंदी भाषिक लोकांना मारहाण करत आहेत. महाराष्ट्रात हिंदी भाषिकांवर (Hindi Speakers) होणाऱ्या हल्ल्यांचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात आला. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीने महाराष्ट्रातील (Raj Thackeray) हिंदी भाषिकांना सुरक्षा प्रदान करण्याची मागणी सरकारकडे केली.

संसदेमध्ये राजेश वर्मा यांनी म्हटलंय की, मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांचं लक्ष एका विशेष मुद्द्यावर केंद्रित करतो. एखादी व्यक्ती जर आपली आई, वडिल आणि कुटुंबाला सोडून जर दुसऱ्या राज्यात जावून नोकरी करत असेल (Maharashtra) तर, तो शौक म्हणून नाही तर मजबूरी म्हणून करतो. कोणताही कारखाना, उद्योग व्यवसाय, किंवा व्यापारी घराणे एखाद्या कर्मचाऱ्याला कामावर ठेवत असतील तर त्याच्यावर उपकार करत नाही. त्याची योग्यता पाहून त्याला कामावर ठेवले जाते.

“राज्यपालांकडे ‘वीटो’ नाही, राजकीय कारणांसाठी”, तामिळनाडूच्या राज्यपालांना ‘सुप्रीम’ दणका

तर योग्यतेच्या आधारावर नोकरी देणाऱ्या महाराष्ट्रामध्ये पूर्वांचली हिंदी भाषिंकाना मनसेच्या गुंडाकडून सातत्याने मारहाण केली जात आहे. मी तुमच्या माध्यमातून हा विषय या भवनात मांडू इच्छितो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना विनंती करतो की, पूर्वांचली हिंदी भाषिकांना आपण संरक्षण देण्याचं काम करा. कारण मनसेच्या लोकांचं राजकीय अस्तित्व हरवत चाललं आहे. त्यामुळे ते आपल्याला हरवलेल्या राजकीय अस्मितेला जपण्यासाठी असं वागत असल्याची टीका राजेश वर्मा यांनी केलीय.

दरम्यान न्यायालयाने निवडणूक आयोगाला मनसेची मान्यता रद्द करण्याचे निर्देश द्यावेत. राज ठाकरे यांच्या द्वेषपूर्ण भाषणांची आणि त्यानंतर झालेल्या हिंसाचाराची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी केली आहे.

धक्कादायक! मुंबईत आमदार कार्यकर्त्याच्या वडिलांचा मृत्यू; रुग्णवाहिकेला झाला उशीर?

गेल्या काही काळापासून, महाराष्ट्रातील हिंदी पट्ट्यातील लोकांवर मराठी भाषा न बोलल्यामुळे मनसे कार्यकर्ते हल्ला करत असल्याच्या बातम्या येत आहेत. अलिकडेच मुंबईतील पवई भागात मराठी न बोलल्याने एका सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. गेल्या महिन्यात, वर्सोवा येथेही, डी-मार्टच्या एका कर्मचाऱ्याला मराठीत न बोलल्याबद्दल मारहाण करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर सांगितले की, महाराष्ट्रात मराठी बोलण्याचा आग्रह करण्यात काहीही गैर नाही. मराठीचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. पण, जर कोणी यासाठी कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं.

 

follow us