मालकाची बॉडी ठेवायला सुद्धा जागा नव्हती’, मंगेशकर रूग्णालयास जमीन देणाऱ्या खिलारेंनी सगळं सांगितलं

मालकाची बॉडी ठेवायला सुद्धा जागा नव्हती’, मंगेशकर रूग्णालयास जमीन देणाऱ्या खिलारेंनी सगळं सांगितलं

Khilare Family Land To Dinanath Mangeshkar Hospital : तनिषा भिसे (Tanisha Bhise) नावाची गर्भवती महिला उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात गेली. परंतु पैशाअभावी उपचार भेटला नाही, दरम्यान या मातेचा मृत्यू झाला. यासाठी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचं प्रशासन जबाबदार असल्याचं बोललं जातंय. पुण्याचे माजी महापौर भाऊसाहेब खिलारे यांनी या रूग्णालयासाठी (Dinanath Mangeshkar Hospital) जमीन दान केली होती. त्यांच्या परिवाराला आज या घटनेनंतर वाईट वाटतंय. जो हेतू मनात ठेवून भाऊसाहेबांनी जमीन दान केली होती, तो पूर्ण होत नसल्याचं त्यांच्या कुटुंबाचं मत आहे. खिलारे कुटूंबीयांची (Khilare Family) लेट्सअप मराठीने घेतलेली खास मुलाखत…

ज्या हेतुसाठी राज्य सरकारने त्यांना ही जागा दिली आहे, तो हेतु साध्य होतोय का? मधल्या काळात राज्य सरकारने त्यांना पुलासाठी जागा दिली आहे. घरात मिटिंग झाली की, परिसरात एखादं चांगलं रूग्णालय होत असेल तर नागरिकांची सोय (Pune News) होईल, या हेतुने आम्ही जागा दिली होती. परंतु रूग्णालय चालवताना नैतिकता असली पाहिजे. चांगली सेवा दिली पाहिजे. डिपॉझिट नसल्या कारणाने आपण रूग्णाचे उपचार करत नसणार तर काय फायदा? या घटनेत आम्ही स्वत:ला दोषी मानतो. खिलारे कुटुंबियाने ती जागा दिली. तिथे तनिषा ताईला उपचारासाठी जावं लागलं अन् तिचा मृत्यू झाला. आपण तनिषा ताईला परत आणू शकणार आहे का? असा सवाल देखील खिलारे कुटुंबियांकडून होतोय.

Khilare Family Exclusive : मंगेशकर रूग्णालयास जमीन देणाऱ्या खिलारे कुटूंबीयांच्या भावना काय?

जर भिसे यांचा मृत्यू उपचारादरम्यान झाला असता तर साहाजिक होतं. परंतु या घटनेत पैशाची मागणी आधी केली गेली. जेव्हा ही घटना आमच्या कानावर आली तेव्हा, आम्हाला वाटलं की, आम्ही धर्मादाय हेतुने ही जागा दिली होती. तो हेतू इथे साध्यच झाला नाही. खिलारे कुटुंबाला याचं खूप दु:ख झालंय. आमचं नाव लावा, आमचं बॉडीवर कुणी घ्या अशा अटींशिवाय आम्ही ही जागा दिली होती. फक्त एक अट होती की, आमच्या परिसरातील लोकांना 30 टक्के सवलतीसह उपचार द्या. उपचार न मिळाल्याने हा मृत्यू झालाय.

हा खेद व्यक्त करण्यासाठी मी फेसबुक पोस्ट केलेली होती. 1986 साली आमचे काका आम्हाला त्या जागेवर घेवून जात होते. सर्वसामान्य माणूस जेव्हा दारावर जातो, तिथे केवळ पैशाअभावी उपचार नाकारला जातो. हे दु:खद नाही का? असं देखील खिलारे कुटुंबियांनी सवाल केला. मूळ मालकाने जागा दिली, त्या मालकाची बॉडी ठेवायला देखील रूग्णालयात जागा नव्हती, असं देखील त्यांनी सांगितलं. हा प्रसंग मी आजवर कोणालाही बोललो नव्हतो, कारण फार संवदेनशील घटना होती.

केलेल्या करामतींची किंमत चुकवण्याची वेळ; मोदींच्या खांद्यावर बंदूक ठेवत पवारांच्या राष्ट्रवादीनं डिवचलं

आमची अपेक्षा होती की आम्हाला दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाकडून चांगले उपचार मिळतील. रूग्णालयात नैतिकता क्लासेत घ्यावेत, अशी मागणी खिलारे कुटुंबानी केली आहे. हे एक दुर्दैव आहे की, घटना घडल्यानंतर सगळ्या सुधारणा होत आहे. याचा बोध सगळे रूग्णालय घेतील. सरकारकडे मागणी आहे की, सगळीकडे सुधारणा व्हायला पाहिजे. तर डॉ. केळकरांनी मान्य केलंय की, आम्ही डिपॉझिट घेणार नाही. आता आम्ही खिलारे फॅमिली लक्ष ठेवू की, आमच्या शेतीत ते रूग्णालय उभं आहे. तिथे वेगळ्या घटना घडायला नको. किंवा मग आम्ही तिथे आमची एक पब्लिक ट्रस्ट तयार करू. तिथे आमच्या खिलारे फॅमिलीतील काही सदस्य असतील, आणि मग आम्ही हे हॉस्पिटल चालवायला घेवू, असं खिलारे कुटुंबियांनी सांगितलं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube