Download App

राजस्थानमध्ये हालचाली वाढल्या! गेहलोत यांच्यानंतर वसुंधरा राजेंनी घेतली राज्यपालांची भेट

  • Written By: Last Updated:

Vasundhara Raje: देशातील पाच राज्यांच्या विधानसभांचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली होती. दोन दिवसांपूर्वी एक्झिट पोल समोर आले असून यात भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) काटे की टक्कर असल्याचं दिसून आलं. दरम्यान, आता दोन्ही पक्ष अॅक्शन मोडमध्ये आले. एक्झिट पोल आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया (Vasundhara Raje Scindia) यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. राजस्थानच्या राजकारणातील या दोन दिग्गजांच्या राज्यपालांशी झालेल्या भेटीवरून अनेक राजकीय तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

Maratha Reservation : …तोपर्यंत जरांगेंनी जरा सबुरी ठेवावी; मंत्री राधाकृष्ण विखेंचा सल्ला 

राजस्थानमधील बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपने राज्यात सरकार स्थापन केल्याचे दिसून आले आहे. पण इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडिया आणि टुडे चाणक्यने त्यांच्या एक्झिट पोलमध्ये राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यात निकराची लढत होण्याची शक्यता वर्तवली आहे. दोन्ही एजन्सीनुसार राज्यात काँग्रेसची थोडीशी आघाडी आहे. अॅक्सिस माय इंडियाने आपल्या एक्सिठ पोलमध्ये BJP ला 80 ते100 जागा आणि काँग्रेसला 86 ते 106 जागा दिल्या आहेत. आज चाणक्यने काँग्रेसला 101 (±12 जागा) आणि भाजपला 89 (±12 जागा) दिल्या आहेत.

Prajakta Mali : नववधू प्रिया मी बावरते… प्राजक्ताचा नवा लूक; चाहते घायाळ! 

‘पोल ऑफ पोल्स’ (सर्व एजन्सीच्या एक्झिट पोलची सरासरी) वरून राजस्थानमध्ये भाजपचे सरकार बनण्याची शक्यता दिसते. त्यांना 110 ते 116 जागा मिळण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलच्या निकालात एवढी निकराची लढत पाहून भाजप आणि काँग्रेसने अपक्ष उमेदवार आणि इतर छोट्या पक्षांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.

वसुंधरा आणि गेहलोत सक्रिय

त्याचवेळी अशोक गेहलोत हे मुख्यमंत्री असल्याने या निवडणुकीत काँग्रेसचा चेहरा होता. राज्यातील निवडणूक प्रचारादरम्यान, पक्षाने होर्डिंग्ज आणि बॅनरवर अशोक गेहलोत यांचे फोटो ठळकपणे प्रसिद्ध केली होती. अशा स्थितीत निकाल काँग्रेसच्या बाजूने लागल्यास अशोक गेहलोत यांचा मान आणखी वाढेल. कारण अनेक दशकांत प्रथमच राज्यात सत्ता अबाधित राहणार आहे. सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी बारमेर जिल्ह्यातील भाजप बंडखोर रवींद्र सिंग भाटी आणि प्रियंका चौधरी यांच्याशी संपर्क साधला आहे. काँग्रेसच्या दोन बंडखोरांवरही भाजपचा डोळा आहे. भाटी आणि चौधरी यांनी सांगितले की, त्यांना भाजप व कॉंग्रेस नेत्यांचे फोन येत आहेत.

राजस्थानमध्ये भाजपने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून अधिकृतपणे कोणाचीही घोषणा केलेली नाही. पण वसुंधरा राजे यांच्या कामगिरीचा अर्थ असा काढला जात आहे की, राजस्थानमधील निकाल भाजपच्या बाजूने गेल्यास केंद्रीय नेतृत्व पुन्हा एकदा त्यांच्याकडे राज्याची कमान सोपवू शकते.

follow us