Download App

Rajya Sabha : राज्यसभेच्या 15 जागांसाठी आज मतदान; सपा-काँग्रेससह विरोधकांची वाढली ‘धाकधूक’

Rajya Sabha Election : लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्याआधी राज्यसभेतील रिक्त जागांसाठी निवडणूक (Rajya Sabha Election) होत आहे. या जागांसाठी आज मतदान होणार आहे. या मतदानासाठी आमदार विधिमंडळात येण्यास सुरुवात झाली असून थोड्याच वेळात मतदानास सुरुवात होणार आहे. 15 जागांसाठी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. यानंतर सायंकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे. मतमोजणीनंतर निकाल जाहीर केला जाणार आहे.

देशभरातून रिक्त झालेल्या 56 जागांपैकी 41 जागा बिनविरोध झाल्या आहेत. यानंतर 15 जागांसाठी मात्र मतदान घेण्यात येत आहे. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकातील या जागा आहेत. या ठिकाणी भाजपने आठवा उमेदवार दिला आहे. त्यामुळे सपा काँग्रेससह विरोधकांची धाकधूक वाढली आहे. उत्तर प्रदेशाप्रमाणेच कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशात उलथापालथ होईल का, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

उत्तर प्रदेशातील 10 जागांसाठी 15 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने आठ उमेदवार दिले आहेत. समाजवादी पार्टीने तिघा जणांना उमेदवार दिले आहेत. कर्नाटक राज्यात चार जागांपैकी फक्त एक जागा मिळवण्याची क्षमता असताना भाजप-जेडीएस युतीने दुसरा उमेदवार दिला आहे. त्यामुळे येथील निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

राज्यसभा निवडणुकीत काय होणार? भाजपच्या खेळीने तीन राज्यांमध्ये INDIA आघाडीचा जीव टांगणीला

देशातील 15 राज्यांमधील 56 जागांसाठी राज्यसभा निवडणुकींची घोषणा झाली आहे. यातील 12 राज्यांमधील 41 जागांवर बिनविरोध निवडणूक झाली आहे. तर तीन राज्यांमधील 15 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या तीन राज्यांमध्ये उत्तर प्रदेशच्या 10, कर्नाटकमधील चार आणि हिमाचल प्रदेशमधील एका जागेचा समावेश आहे. या कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसकडे (Congress) तर उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाकडे (Samajwadi Party) त्यांचे खासदार निवडून आणण्यासाठी पुरसे बहुमत आहे. मात्र भाजपने तिन्ही ठिकाणी (BJP) एक उमेदवार अतिरिक्त दिल्याने काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची धाकधूक वाढली आहे.

follow us