Ram Mandir : सध्या सर्वत्र चर्चा आहे ती फक्त अन् फक्त आयोध्येत 22 तारखेला उद्घाटन होणाऱ्या राम मंदिराची. (Ram Mandir ) त्याच निमित्ताने आपण जाणून घेऊ कसं आहे हे राम मंदिर 392 खांब, 5 मंडप, सीताकूप असं बरचं काय-काय असणाऱ्या राम मंदिराच्या आणखी काही खास गोष्टी कोणत्या आहेत. पाहुयात…
“BJP आपल्या धर्माचा शत्रू , 20 ते 26 जानेवारी घरीच रहा” : बड्या मुस्लिम नेत्याचा सल्ला
आयोध्यात निर्माण केलं जात असणारं प्रभू श्रीरामांचं मंदिर हे पारंपारिक नागरशैलीमध्ये बांधण्यात येत आहे. या मंदिराच्या परिसर पूर्व पश्चिम असा 380 फूट लांब आणि 250 फूट रुंद आहे. तर मंदिराची उंची तब्बल 161 फूट असून प्रत्येक मजला हा वीस फूट उंचीचा आहे मंदिराला एकूण 392 खांब आणि 44 फाटक आहेत. या मंदिर निर्माणाच्या कार्यामध्ये सध्या पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण झालं आहे.
शरद मोहोळ हत्याप्रकरण: मुख्य आरोपीसह आठ जणांना पोलिस कोठडी; पण वकिलांचा वेगळाच युक्तिवाद
मंदिराचे एकूण पाच मंडप असतील ज्यामध्ये नृत्य मंडप, रंग मंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप यांचा समावेश असेल. तर या मंदिराच्या खांबांवर देवी देवतांच्या मूर्तींचं कोरीव कास करण्यात आलं आहे. मंदिराच्या पूर्व दिशेने 32 पायऱ्या चढून आल्यानंतर आपण सिंहद्वार या ठिकाणी पोहोचतो. तसेच या ठिकाणी दिव्यांग आणि वृद्धांसाठी लिफ्ट आणि रॅम्पची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे.
“लवकरच मोठा राजकीय भूकंप” : गिरीश महाजनांचा दाव्याने CM शिंदे अन् ‘काँग्रेस’ टेन्शनमध्ये!
यामध्ये मंदिराच्या मुख्य गर्भृहामध्ये प्रभू श्रीरामांचे बाल स्वरूप मूर्ती असणार आहे. पहिल्या मजला हा श्रीरामांचा दरबार असणार आहे. मंदिराच्या चारही बाजूंनी आयताकार तटबंदी आहे. याची लांबी 732 मीटर आणि रुंदी 14 फूट आहे. बंदीच्या चारही कोपऱ्यांवर सूर्यदेव, माता भगवती, गणपती आणि भगवान शंकराचे मंदिर असेल. तसेच उत्तरेला अन्नपूर्णा आणि दक्षिणेला हनुमानाचही मंदिर असणार आहे.
Maratha Reservation : मनोज जरांगेंची पदयात्रा नगरमधील ‘या’ ठिकाणी मुक्कामी…
मंदिराच्या जवळच पौराणिक काळातील सीताकूप आहे. तर मंदिराच्या परिसरामध्ये इतर महर्षी वाल्मिकी, महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वमित्र, महर्षी अगस्त्य, निषादराज, माता शबरी आणि ऋषी पत्नी देवी अहिल्या यांची देखील मंदिरं असणार आहेत. तर सुरुवातीपासूनच दक्षिण-पश्चिम विभागामध्ये असलेल्या नवरत्न कुबेर टिला या ठिकाणच्या भगवान शंकराच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. तसेच त्या ठिकाणी जटायूची प्रतिमा देखील स्थापन करण्यात आली आहे.
‘मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध’; CM शिंदेची ग्वाही
या मंदिराची खासियत म्हणजे या ठिकाणी कोणत्याही लोखंडाचा वापर केलेला नाही. तर जमिनीच्यावर कुठेही काँक्रीट नाही. जमिनीच्या खाली 14 मीटर रोलर कॉम्पॅक्टेड काँक्रीट पसरवण्यात आलेलं आहे. ज्याला कृत्रिम खडकाचे रूप देण्यात आलं. जमिनीच्या ओलाव्यापासून मंदिराला वाचवण्यासाठी 21 फूट उंच प्लिंथ ग्रॅनाईट या फरशीचा वापर करण्यात आलाय. तसेच इतर सुविधांसाठी बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून राहू लागू नये. यासाठी स्वतंत्रपणे सीवर ट्रीटमेंट प्लांट, वॉटर ट्रीटमेंट प्लांट. अग्निशमन दलासाठी जलव्यवस्था आणि स्वतंत्र पॉवर स्टेशन निर्माण करण्यात आलेलं आहे.
आलेल्या भाविकांसाठी तब्बल 25 हजार लोकांचे क्षमता असणार सुविधा केंद्र बनवण्यात आले असून त्या ठिकाणी भाविक त्यांचे सामान लॉकरमध्ये देखील ठेवू शकतील. तसेच मंदिर परिसरामध्ये स्नानगृह, शौचालय, वॉश बेसिन्स, ओपन टॅप्स असून मंदिराचे निर्माण पूर्णतः भारतीय परंपरेनुसार आणि देशी तंत्रज्ञानापासून करण्यात आले आहे. पाण्याची बचत आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी या एकूण 70 एकर क्षेत्रामध्ये तब्बल सत्तर टक्के क्षेत्रावर वृक्ष लागवड करण्यात आली आहे. तर आहे ना मंडळी तुम्हाला कशी वाटली राम मंदिरांच्या निर्माणाची खासियत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा…